दि. १४ मे राशिभविष्य : अक्षय्यतृतीयेला ग्रहांच्या शुभयोगावर ‘या’ राशींना धनलाभ

    मेष – आर्थिक दृष्टिकोणातून आजचा दिवस मागील काही दिवसांपेक्षा चांगला राहील.कार्यक्षेत्रातून अतिरिक्त उपन्न मिळेल.अडलेली कामे पूर्ण झाल्यानेही धनलाभ होईल.परंतु आज खर्च केल्यास भविष्यात मोठ्या खर्चाची योजना बनेल.सामाजिक कार्यात पुरेसा वेळ देऊ न शकल्याने लोकांशी दुरावा वाढेल.संध्याकाळच्या वेळी पूर्वनियोजनाप्रमाणे प्रवास किंवा पार्टीची योजना बनेल.उत्तम जेवणासोबत संसारिक सुख लाभेल.अपत्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल.

    वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रफलदायी ठरेल.आज बऱ्याच दिवसांपासून अर्धवट राहिलेला काँट्रॅक्ट पुढे ढकलला गेल्याने धनलाभ मिळवण्याची इच्छा अपूर्ण राहील.व्यवसायावर अधिक लक्ष देऊनही कामे पूर्ण होण्यास उशीर लागेल.लाभ मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील परंतु पैसे मिळण्यासाठी थोडी वाट पहावी लागू शकते.नवीन संबंधांमुळे नशीब चमकेल.सामाजिक सन्मान प्राप्त होईल.संध्याकाळच्या वेळी सामाजिक संबंध तुमच्यासाठी लाभदायक ठरतील.नवीन योजनेकडे लक्ष द्या,अचानक लाभ मिळू शकतो.

    मिथुन – आज मिथुन राशीत चंद्राचे आगमन होत आहे.संध्याकाळी धनलाभ होण्याची शक्यता आहे.अश्यात आज दिवसाचा पूर्वार्ध तुमच्यासाठी खर्चिक पण आनंद देणारा ठरेल.संध्याकाळी लाभाच्या संधी मिळतील.कामाचा दबाव राहील.दिवसभरात कोणताही मोठा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही याची काळजी घ्या.धार्मिक कार्यात रुची वाढेल.बहीण आणि जोडीदाराचे सहकार्य लाभेल.आरोग्य उत्तम राहील,चांगले चविष्ट अन्नपदार्थ खायला मिळतील.

    कर्क – आजचा दिवस मिश्रफलदायी राहील.कामाच्या ठिकाणी तुमच्या बेजबाबदारपणामुळे अधिकारी वर्गाचे डोके गरम होऊ शकतो,आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.दांपत्यजीवन उत्तम राहील.दैनंदिन व्यापारी वर्गाला अधिक मेहनत करावी लागेल.स्टेशनरी किंवा प्रिंटिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अचानक नवीन कामे मिळू शकतात.कुटुंबासाठी तुम्ही काहीतरी नवीन कराल.संध्याकाळनंतर गरजेनुसार धनप्राप्ती होईल.सामाजिक क्षेत्रात योग्य ताळमेळ राखण्यात यशस्वी व्हाल.

    सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रफलदायी ठरेल.दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक दृष्टीने समाधानी राहाल.कामाच्या ठिकाणी विक्री वाढल्याने पैश्यांची आवक वाढेल.व्यक्तिमत्त्व विकासामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.परंतु पैसे हातात आल्यावर मन नको त्या गोष्टीत रमू लागेल.सोबतच काही काळासाठी कौटुंबिक समस्यांमुळे मन अशांत राहील.घरामध्ये वादविवादात वाढ होण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे दुपारनंतर करणे फायद्याचे ठरेल.

    कन्या – आज तुम्ही सर्व कामे नीट विचारपूर्वक कराल तरीही यश प्राप्तीसाठी विलंब होईल.मनामध्ये नकारात्मक भावना शरीर आणि मन दोन्ही विचलित करतील.तुम्ही विवेकी राहाल तसेच चांगल्या वाईटची पूर्वकल्पनाही येईल.तरीही मन अनैतिक कामात अडकू शकते.संसारिक समस्या नाहीश्या होतील व राजकीय मदत मिळेल.बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.संध्याकाळच्या वेळी व्यवसायात अचानक धनलाभ मिळण्याचे योग तयार होत आहेत.

    तूळ – आजचा दिवस तुम्हाला सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळवून देईल.परंतु कौटुंबिक वातावरण एखाद्या गैरसमजामुळे कलुषित होऊ शकते.तरीही आज परिस्थितीवर तुमची चांगली पकड राहील.शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.आजच्या दिनचर्येतून लाभ मिळवण्यासाठी आळसापासून लांब राहणे गरजेचे आहे.व्यावसायिक आपल्या भागीदारांसोबत असणाऱ्या जुन्या कुरबुरी विसरून नवीन जोशात काम सुरू करण्याचे प्रयत्न करतील व त्यात यशस्वीही होतील.कामाच्या ठिकाणी सहकारी वर्ग तुमच्या कामामुळे आनंदी राहील त्यामुळे तुम्ही आपली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल.

    वृश्चिक – आज धैर्याने काम केल्यास तुम्हाला अपेक्षेहून जास्त लाभ मिळवता येऊ शकतो.आज तुमची दिनचर्या काहिशी मंद राहील.प्रत्येक काम हळूहळू कराल त्यामुळे लोकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागू शकते.आज तुम्ही वास्तविक दुनियेपेक्षा काल्पनिक दुनियेत रमाल ज्यामुळे लोकं तुमची मस्करी करतील.उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल.घरगुती उपयोगाच्या वस्तू तसेच मजामस्ती यावर दिखाव्यासाठी पैसे खर्च कराल त्यामुळे पुढील काळात आर्थिक स्थिती बिघडेल.

    धनू – आज तुम्ही मनातून खूप आनंदी राहाल परंतु तुमचे बेजबाबदार वागणे व्यवहार कलहाचे कारण बनू शकते.असंयमित दिनचर्येमुळे शारीरिक थकवा आणि अस्वस्थता अनुभवाल.आज तुम्ही एखादा ठोस निर्णय घेऊ शकणार नाही.दिलेला शब्द फिरवल्याने कामाच्या ठिकाणी किंवा घरी वादविवाद होण्याची शक्यता आहे.मजामस्तीला आपल्या कामापेक्षा जास्त महत्व दिल्याने नुकसान होऊ शकते.पैश्यांशी संबंधित योजनेचा विचार मनात सुरू राहील.

    मकर – आज शारीरिक रूपाने तुम्ही अतिशय सतर्कता बाळगणे अतिशय आवश्यक आहे.अकस्मात दुर्घटना आणि इतर काही कारणास्तव शारीरिक त्रास उद्धभवू शकतो.हात आणि पायात शिथिलता जाणवेल.त्याचा परिणाम रोजच्या कामावर होऊ शकतो.व्यावसायिक कामात आज अतिरिक्त धावपळ करावी लागेल.परंतु उशिराने का होईना त्यातून लाभ मिळेल.कौटुंबिक वातावरण आज भावूक राहील.दांपत्य जीवन उत्तम राहील.कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वादविवाद होऊ शकतो.

    कुंभ – सामाजिक क्षेत्र आणि घरामध्ये धैर्याने काम करा. एखाद्या गोष्टीवर दिलेल्या शीघ्र प्रतिक्रियेमुळे वातावरण बिघडू शकते.दुपारनंतर एखादी चांगली बातमी ऐकायला मिळाल्याने मन आनंदी होईल.एखाद्या सरकारी संस्थेमार्फत दूरगामी लाभ मिळण्याची परिस्थिती आज निर्माण होईल.घरामध्ये एखाद्या व्यक्तीसोबत रूसवाफुगवा सुरू राहील,तरीही वातावरण शांत राहील.निराशाजनक विचारांपासून लांब राहा.वर्जित कामापासून पैसे मिळवण्याचा प्रयत्न कराल परंतु यशप्राप्ती होण्याची शक्यता कमी आहे.नव्या संपर्कामुळे नशीब चमकेल.

    मीन – आज दुपारनंतर कोणत्याही कामात तुम्हाला अडथळे येणार नाहीत. व्यवसायातही सर्व कामे अगदी व्यवस्थित सुरू राहतील. जुन्या चुकांमधून शिकता येईल. उधारी वसूल करू शकाल. सरकारी किंवा वडिलांशी संबंधित कामे आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा,लाभ मिळू शकतो. घरातील वृद्ध माणसांसोबत काही कारणास्तव मतभेद निर्माण होऊ शकतो. परंतु काही काळाने परिस्थितीत सुधारणा होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस उत्तम राहील. अचानक खर्च उदभवल्यास त्रास होणार नाही.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here