दोंडाईचा येथे गुण्यागोविंदाने अक्षयतृतीया व ईद साजरी

अनेकांनी घरीच घागर पुजत,नमाज पठण करत परिवारासोबत सणाचा आनंद साजरा केला

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर दोंडाईचा येथे दिनांक १४ मे रोजी हिन्दु समाजाचा अक्षयतृतीया हा सण व मुस्लिम समाजाचा ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने दोघी समाजाने कोरोना आजाराची गंभीरता समजत, शासनाने घालून दिलेले नियम पाळत. अत्यंत गुण्यागोविंदाने शातंतेत घरीच राहून परिवारासोबत मिष्टान्न बनवत सणाचा आनंद साजरा केला.

आज सकाळी स्टेशन भाग व खालच्या वरवाडे भागातील बाजारपेठेत दैनंदिन कमाईतुन हातावर पोट असणाऱ्या लोकांनी सणासाठी लागणाऱ्या विविध वस्तू, गोडधोड खरेदी करायची लगबग सुरू केली होती. तर काहींनी कालच अक्षयतुतीयाला लागणारे घागर,डांगर आंबे यांची खरेदी केली होती. तर मुस्लिम लोकांनीही दोन दिवस अगोदर ईदसाठी लागणारे साहित्य जसे काजू ,बदाम,खोबरे,घी, किसमिस ,चारोळी आदीसोबत कपडे खरेदीची कामे उरकवली होती. त्यामुळे तुरळक गर्दी वगळता आज बाजारात अकरा वाजेनंतर शुकशुकाट जाणवत होता. कारण अनेक मुस्लिम बांधवांनी सकाळपासुन ईदनिमित्त घरीच नमाज पठण कार्यक्रमात लागले होते. तर हिन्दु लोकांनी अकरा वाजेच्या आत बाजारहाट करत घरी घागर पुजनाचा कार्यक्रम साजरा केला.

अक्षयतृतीया व ईद हे दोन्ही सण जनतेने शांततेत व कोरोना आजाराच्या पाश्वभुमीवर शासनाचे नियम पाळत,गावात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट न लागता, लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी न करता, घरीच राहून परिवारासोबत आनंद घ्यावा असे आवाहन शासनाचे प्रतिनिधी म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गश तिवारी यांनी समाज बांधवाची बैठक घेत,विविध पत्रकार बांधव व प्रसार माध्यमातून जनतेला आवाहन करत करोना आजाराबाबत सावध केले होते. ह्याकामी त्यांच्यासोबत दोंडाईचा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले,पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचीन गायकवाड, पोलीस नाईक योगेश पाटील, विनायक खैरनार, मुकेश आहिरे, राजेंद्र सोनवणे, संदीप कदम आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here