अहमदनगर (प्रतिनिधी कृष्णा साठे) – दि.१२ मे जागतिक परिचारीका दिन ” (नर्स डे ) गेले वर्ष सव्वावर्ष डाँक्टर्स ,नर्सेस,पँरामेडीकल स्टाप ..अनेक स्वयंसेवी संस्था चे स्वयंसेवक कोरोना काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अव्याहत परिश्रम घेत आहेत .आपल्या कुटुंबाची काळजी घेत रुग्णांना सेवा देत असलेल्या या कोरोना योध्यांना स्फुर्ती देण्यासाठी ते करत असलेल्या अविरत सेवेबद्दल त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. म्हणूनच भारतीय मजदूर संघ अ.नगर जिल्ह्याच्या वतीने दि.१२ मे २०२१ जागतिक परिचारीका दिना निमित्त “कोरोना योध्दा ” म्हणून नगर जिल्ह्यातील कोरोना योध्दे डाँक्टर्स ,नर्स ,पँरामेडीकल स्टाफ व स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक कार्यकर्ते बंधु भगीनीं यांचा सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
नगर शहरातील भिंगार छावनी परिषद हाँस्पिटल ,प्रोफेसर चौक ,तहसील कार्यालया जवळील लसीकरण केंद्र ,सिव्हिल हाँस्पिटल , केशव -माधव कोविड सेंटर ,देशपांडे हाँस्पिटल ,महानगर पालीका कोविड सेंटर या ठिकाणी तर नगर तालुक्यात वाळकी,अरणगाव सह श्रीगोंदा ,जामखेड ,राहता कोपरगाव,संगमनेर ,अकोला तालुक्यात कोविड योध्दे नर्स व संबंधित कर्मचारी यांचा सन्मानपत्र देऊन भारतीय मजदूर संघ नगर जिल्ह्याच्या वतीने गौरव करण्यात आला.या प्रसंगी संबंधित नर्सेस व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कट भावना व्यक्त करुन या सन्मानामुळे आम्ही भाराऊन गेलो ..आमच्या कार्याची दखल घेणारे समाजात कोणीतरी आहेत ..यामुळे आम्हाला कोविड विरुध्दच्या लढ्यासाठी शक्ती मिळाली अशा शब्दांत भावना प्रकट केल्या .
विशेषतः भिंगार कँन्टोन्मेंट येथे स्वतः मुख्याधिकारी, यांनी कार्यक्रमात उपस्थित राहुन उत्फुर्त सहभाग नोंदवला. कोविडच्या सध्याच्या परिस्थिती नुसार सर्व शासकीय नियमांचे पालन करुन मर्यादित संख्येच्या उपस्थितीत सर्वत्र कार्यक्रम संपन्न झाले.भारतीय मजदूर संघ सलग्न -राज शासकीय कर्मचारी संघ ,पोस्टल युनियन,बांधकाम कामगार संघ ,विज कामगार संघटना ,बँक कर्मचारी संघटना,पुरातत्व विभाग कर्मचारी संघटना सुरक्षा रक्षक संघटना आदी संघटनेचे कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातुन व परिश्रमातून कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी संघटनेचे सर्वश्री.संजय दुधाने, दिनेश पुसदकर,अविनाश चारगुंडी,नंदकुमार चिंतामणी, प्रकाश नहार,सुजित उदरभरे ,सुनिल मुंगसे,सौ.संयुक्ता पोळ,सौ.जयश्री राहिंज सौ.वंदना धनवटे, संदिप हापसे राजेंद्र परदेशी कृष्णा साठे श्री.आविनाश कांबळे ,सौ.कांता कांबळे आदीनी परिश्रम घेतले.






