शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) – तालुक्यातील काथर्दे दिगर येथे जि. प. शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र कलसाडी अंतर्गत शुक्रवारी सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली यात एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.
काथर्दे दिगर येथील नागरिकांनी स्वतः येऊन कोरोना तपासणी करून घेतली त्यासाठी ग्रामपंचायतीने दिलेल्या आदेशानुसार गावातील एकही व्यक्तीने कोरोना नियमांचे उल्लंघन केले नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने नागरिकांचे कौतुक करण्यात आले व त्यामुळे काथर्दे दिगर कोरोना मुक्त होतांना दिसून येत आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले
यावेळी कलसाडी आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक एस. ए. सरदार, सरपंच गोरख भील, उपसरपंच गुलझार गिरासे, पोलीस पाटील कोमलसिंग गिरासे, अंगणवाडी सेविका कविता चौधरी या सर्वांनी सहकार्य केले.






