शिंदखेडा व दोंडाईचा येथे लवकरच आँक्सीजन प्लाँट उभारणार…
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – आज येथील उपजिल्हा रूग्णालयात १०२ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेचे आमदार जयकुमारभाऊ रावळ यांच्या हस्ते नारळ वाढवून लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार रावळ यांनी उपजिल्हा रुग्णालयातील समस्या जाणून घेत.त्यावर सुझाव दिले. तसेच उपजिल्हा रुग्णालयात मतदार संघ व बाहेरून आलेला पेंशट कोणत्याही परिस्थितीत येथून वैधकीय सेवा मिळवण्या बिगर जाता कामा नये,अश्या कडक सुचना त्यांनी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
आज दिनांक १५ मे शनिवार रोजी दुपारी १२.०० वाजता दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात १०२ क्रमाकांच्या रूग्ण वाहिकेचे लोकार्पण कार्यक्रम रूग्णालयामार्फत आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष नबूभाई पिंजारी, आरोग्य सभापती पती कुष्णा नगराळे, नगरसेवक जितेंद्र गिरासे, संजय तावडे, अहमद शेख, पंकज चौधरी, संजय चंदणे, पंकज बोरसे, छोटू ढोले, इस्माईल पिजांरी, मनोज सोनवणे,अनिल सिसोदिया, वैधकीय अधीक्षक श्री डॉ. भुषण काटे,डॉ. तेजस जैन, नेरपगार,नर्सेस आदी स्टाँप उपस्थित होता.
यावेळी शिंदखेडा मतदार संघाचे आमदार यांनी सांगितले की, उपजिल्हा रुग्णालयातील तुमच्या ज्या ही काही समस्या असतील, त्या माझ्यापर्यंत पाठवा. दोंडाईचा वरवाडे नगरपालिका व आमदार निधीतून आपल्याला सर्वपरी सहकार्य करण्यात येईल. आज देशावर,राज्यावर,जिल्हाजिल्ह्यात व गावपातळीपर्यंत करोना महाभंयकर साथरोगाचे थैमान माणसाला भयभीत करत आहे. त्यात अनेकांचे जीव जात आहे. मनाला हादरून टाकणाऱ्या घटना दैनंदिन आजुबाजुला घडत आहे. म्हणून आपण गाफील न राहता.जनतेचे जीव वाचवण्यासाठी प्राणपणाला लावले पाहिजे. आज तुमच्याकडे जी वैधकीय सेवेची डिग्री आहे. त्यामुळे तुम्हीच जनतेचे प्राण वाचवू शकतात. ह्या कामासाठी तुम्हाला कोणकोणत्या अवजारे, वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ज्या ज्या साहित्याची गरज भासेल, ती पुर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. तसेच आपल्या पाठीशी दोंडाईचा वरवाडे नगरपालिका नेहमी उभी आहे. आपण लवकरच जागा उपलब्ध झाल्याबरोबर शिंदखेडा व दोंडाईचा येथे आँक्सीजन प्लाँट आमदार व डिपीडिसी निधीतुन उभारू. आज देशात करोना साथरोगाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.त्या अगोदर आपण सर्व साधन सामुग्रीसह तयार असायला हवे. कारण आता आपल्याला करोनासोबत लढाई लढत जीवन जगायचे आहे. त्यासाठी आज दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात १०२ क्रमाकांच्या रूग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे रूणांना उच्चतम उपचारासाठी बाहेर गावी जायायचे गरज पडल्यास १०२ क्रमाकांची रूग्णवाहिका कामी येईल. ह्या रूग्णवाहिकेवर चोवीस तास डॉक्टर व डाँयव्हर उपलब्ध राहतील.
आज देशावर आलेले हे संकट खुप वेगळे आहे. याच्यावर कोणी राजकारण, टिकाटिपण्णी करू नये.आपण ह्या लढाईत काय योगदान देवू शकतो हे महत्त्वाचे आहे. दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात आता साठ ते संतर आँक्सीजन बेडची व्यवस्था आहे व येणाऱ्या काळात शंभर बेड आपल्याला उपलब्ध करायचे आहे. म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालयात मतदार संघ व बाहेरून आलेला पेंशट उपचारा बिगर जाता कामा नये,अशाही सुचना त्यांनी शेवटी उपस्थित वैधकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भुषण काटे यांनी आमदार जयकुमार रावळ यांना उपजिल्हा रुग्णालयात कोवीळ सेंटर सुरू असल्यामुळें गरोधर महिलांच्या प्रस्तुती ग्रुह बंद असल्याची जाणीव करून दिली व गेटच्या आत प्रवेश केल्याबरोबर आमदार साहेबांच्याही हा प्रकार लक्षात आला.कारण शहर व परिसरातील गरिब व मध्यमवर्गीय गरोदर महिलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात चकरा मारावा लागत आहे, व प्रत्येकाला शिंदखेडा येथे जाणे शारीरिक व आर्थिकदुर्ष्ट्या पुरवठत नाही. म्हणून आमदार साहेबांनी परिस्थिती लक्षात घेता,लगेच दादासाहेब रावल स्टेडियम येथे सुविधा देण्याचे कबुल केले. यावेळी कार्यक्रमाची सांगता व आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. भुषण काटे यांनी मानले.



