बुलंद महाराष्ट्र पोलीस टाइम्स महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तसेच महाराष्ट्र होमगार्ड संघर्ष समिती आणि महिला शक्ती फाउंडेशन यांचा उपक्रम
ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – अक्षय तृतीया निमित्त अत्यावश्यक सेवेच्या महिला रिक्षा चालक यांना बुलंद महाराष्ट्र पोलीस टाइम्स महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तसेच महाराष्ट्र होमगार्ड संघर्ष समिती आणि महिला शक्ती फाउंडेशन यांच्यामार्फत डॉक्टर अमोल गीते व अजय सिंग, सिद्धार्थ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज पासून अत्यावश्यक सेवा व परिचारिका पोलीस व होमगार्ड बंदोबस्त करीत असलेले कर्मचारी ठाणे महानगरपालिका साफसफाई कर्मचारी यांना मास्क, hand sanitizer bottle, व हैंड क्लोज, face shield हे वाटप करण्यात येत आहे.

यावेळी महाराष्ट्र पोलीस गृहरक्षक संघर्ष समिती ,महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सिद्धार्थ डी जाधव ,निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धीरज पार्सेकर , अमोल माने मुंबई अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक व परिवहन सभापती जितेंद्रकुमार ईदिसे ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे महिला ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ. तृप्ती पाटील, महिला शक्ती फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्षा तसेच महिला अत्याचार समिती अध्यक्षा सौ.शोभना ओवाळ तसेच, वाहतूक शाखा महिला अध्यक्षा सौ प्रीती खाणेकर, अबोली महिला मंडळ अध्यक्षा सो सरोज पोटफोडे, सदस्य श्री रामनिवास दलौड, श्री.राम अठवाल, गुड्डू खान तसेच, राजेश ओवाळ, सुरज ओवाळ, इत्यादींच्या उपस्थित महिला शक्ती फाउंडेशन यांच्या कार्यालय व संगीत अकॅडमी उद्घाटन प्रसंगी हा कार्यक्रम दिनांक 14 /05/2021 रोजी संध्याकाळी सहा वाजता घेण्यात आला.






