एकतर्फी प्रेमातून युवकाने गुप्तीने भोसकून युवतीची केली निर्घृण हत्या

यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – एकतर्फी प्रेमप्रकरणातून गावातीलच युवकाने युवतीच्या घरी जावून गुप्तीने भोसकून निर्घृण खून केल्याची खळबळनजक घटना पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत रामपूरनगर येथे घडली. सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. आकाश श्रीराम आडे (२५) हा आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सुवर्णा हिचे आई, वडील व भाऊ बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून आकाश शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास सुवर्णाच्या घरी पोहोचला. यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच आकाशने सुवर्णाच्या पोटात गुप्तीने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here