धरणगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने दरवाढीबद्दल केंद्र सरकारचा निषेध

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रासायनिक खते, पेट्रोल डिझेल दरवाढ गगनाला भिडलीले असल्याने शेतकरी वर्ग सर्व सामान्य जनता यांना खुपचं आर्थीक नुकसान सोसावे लागत असल्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

माजी मंत्री गुलाबराव देवकर , राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या माध्यमातून नायब तहसीलदार वाडिलाल राठोड यांना निवेदन देऊन , केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार , डि एस पाटील सर , युवक जिल्हा सरचिटणीस भवरखेडा सरपंच किरण पाटील, पष्टाणे सरपंच किशोर निकम , श्यामकांत पाटील , युवक जिल्हा सरचिटणीस शरद पाटील, गिरीश पाटील आदी बहुसंख्य युवक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here