यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) – फैजपूर येथील पोलिस स्टेशन हद्दीतील लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असून या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलिसांनी सुभाष चौक सह परिसरात नाकाबंदी केली असून वेगवेगळ्या ठिकाणी कडक कारवाई सुरू केली आहे .
परिसराच्या पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात आलेलीआहे . १विना मार्क्स तसेच सोशल डिस्टन्स केसेस ११ केसेस. २७००रुपये दंड वसूल.२) तसेच रिक्षाला प्रधान न लावणे . १७७प्रमाणे १२ केसेस . ३६००रुपये दंड ३).व विना हेल्मेट ४केसेस. २०००रुपये दंड ४)एम व्ही अॅक्ट इतर केसेस .२. दंड ४००रु .५)प्रो व्ही केस १. ६)जुगार केस.१.७) अ एन टी जन टेस्ट ९८ टेस्टट्वेन्टी ट्वेन्टी टेस्ट१एन टी जन टेस्ट ९८पैकी ३पॉझिटिव्ह .
जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून लॉक डाऊन सुरू असून करोना चा संसर्ग वाढत असल्याचे चित्र पाहता जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्यात दिनांक १७ रोजी जिल्ह्यात सर्वत्र कडक आदेशाचे पालन व्हावे म्हणून जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले आहे . त्याचप्रमाणे फैजपूर येथील पोलिसांनी कडक अशी नाकाबंदी सुरू केली असल्याचे चित्र असून . फैजपूर सह अमोदा बामणोद . पाडळसा हंबर्डी हिंगोणा फैजपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कडक नाकाबंदी सुरू केली आहे त्यामुळे विनाकारण येणाऱ्या जाणाऱ्यांकडे तसेच महत्त्वाच्या कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांवर लक्ष असून सोशल डिस्टन्स, विना माक्स, विना हेल्मेट मोटारसायकल चालकांवर तसेच वेगवेगळ्या वाहनांवर नजर ठेवली जात आहे
विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे तसेच एपीआय प्रकाश वानखडे पीएसआय रोहिदास ठोंबरे पीएसआय मकसूद तसेच पोलिस कर्मचारी वाहतूक पोलीस बाळू भोई दिनेश भोई राजेश बऱ्हाटे विलास झांबरे अमजद शेख किरण चाटे सानप सानप अनिल महाजन आदी पोलिस कर्मचारी बंदोबस्त करीत आहे.






