माझी वसुंधरा योजना अंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचा नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव येथील प्रभाग क्रमांक 7 मधील किशोर भाटिया यांच्या घराजवळ माझी वसुंधरा या शासनाच्या योजने अंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचा शुभारंभ धरणगाव न.पा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

सदर योजनेचा लाभ धरणगाव शहरातील नागरिकांनी घेऊन पावसाळ्यात गच्चीवरील पाणी वाया न जाता ते आपण केलेल्या बोर जवळ शोष खड्डे करून पाणी अडवण्यास त्याचा लाभ आपल्याला होऊन पाण्याची पातळी सुद्धा वाढून त्या द्वारे आपल्याला जास्त प्रमाणात पाणी मिळेल.

या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,नगरसेवक वासुदेव चौधरी,विजय महाजन,जितेंद्र धनगर,अजय चव्हाण,पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनार व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here