शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कोवीळ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्रास २५ लिटर सोडीयम हायड्रोक्लोरिक व फवारणी पंप वाटपाचा कार्यक्रम

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे माजी द्विवगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून,करोना काळात लोकपयोगी कार्यक्रम आखत,शिंदखेडा काग्रेस कमिटीकडून मोठ्या उत्साहात जंयती साजरी करण्यात आली.

सद्या कोविड सारख्या गंभीर आजारांवर उपाययोजना करण्यासाठी व प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण असलेल्या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी त्याठिकाणी फवारणी होणे आवश्यक आहे. म्हणुन शिंदखेडा तालुका काॅग्रेसच्यावतीने, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिंदखेडा,बेटावद,नरडाणे, वालखेडा,चिमठाणे,धमाणे, विखरण, निमगुळ,मालपुर,दूसाणे या प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुक्यातील कोविड सेंटरला फवारणी करण्यात करिता २५ लिटरप्रमाणे एका केंद्रास सोडियम हायड्रोक्लोराईट व प्रत्येकी एका पंपाचे वाटप आज करण्यात आले.

यावेळी ह्या लोकपयोगी कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर ,प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, नरेंद्र पाटील, बाभडेचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, हिरालाल पाटील,माधवशेठ बडगुजर, डॉ.जयवंत बोरसे, दत्तु गोसावी, रविंद्र पाटील, दिपक आहिरे, उदय देसले, धनराज देसले, खुशाल कोळी, संजय माळी, पुरूषोत्तम पाटील,भाया आबा, महेंद्र देसले, शाम भिल, देवेंद्र पाटील, खंडेराव भदाणे, पंडित पाटील, अर्जुन पाटील, सुकदेव शिंदे, ललित पाटील, गोविंद रूपनार, भरत ओंकार पाटील, भटा बापुजी, तुषार पाटील, गौरव पाटील, विनोद सदाशिव,नाना भिल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here