१० ट्रॅक्टर सह ७७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – शिरूर तालुका, पारनेर तालुका, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे घडत होते त्याअनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री.डॉ.अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मिलींद मोहीते, बारामती विभाग यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांना शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या त्यानुसार मा. पो.नि.श्री. घनवट सो. यांनी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, सहा. फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके,सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, पो.ना. दिपक साबळे, राजू मोमीण, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे, पो.कॉ. संदिप वारे, जितेंद्र मांडगे, अक्षय जावळे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केले होते.
स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरूर शहरात राहणारे इसम नामे सतीश अशोक राक्षे, ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे व प्रविण कैलास कोरडे हे तिघेही एकत्रात फिरतात ते कोणताही कामधंदा करीत नसून त्यांचेकडे वेगवेगळया ट्रॅक्टर, पिकअप अशा गाडया आणतात त्या चोरीच्या असाव्यात अशी माहीती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्याने स्था.गु.शा. पथकाने इसम नामे सतीश अशोक राक्षे, रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर,ता. शिरूर, जि.पुणे, यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले असता त्याने त्याचे साथिदार ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे, रा.रम्यनगरी कॉलनी, धनु झेंडे यांचे बिल्डींगमध्ये, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. जयनगर, ता. औसा, जि. लातूर, प्रविण कैलास कोरडे, मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर,ता. शिरूर, जि.पुणे, व सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते, रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर यांचेसह मिळून २८ ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची माहीती सांगितली
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकुण ७६ लाख ८८ हजार किंमतीचे १० ट्रॅक्टर, २ पिकअप, १ बोलेरो जिप, १ स्कॉपीओ, ६ मोटार सायकल, ऑक्सीजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, ५ गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने असा मोठ्ठा मददेमाल हस्तगत केलेला आहे तसेच आरोपींकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. १) कर्डे गावचे हद्दीतून २ गायी व १ वासरू चोरून नेलेबाबत शिरूर पो.स्टे.ग.रजि.नं. ३२७/२१, भा.दं.वि.कलम ३७९, मौजे न्हावरा गावचे हद्दीत, ता. शिरूर, जि. पुणे येथून चोरलेल्या MH-12-PC-8307 या टॅक्टर चोरीबाबत शिरूर पो.स्टे.गु..नं. ५६५/२०, भा.दं.वि.कलम ३७९, मौजे कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे येथून चोरलेल्या पिकअप गाडी नं. MH-12-JF-5070 हीचेबाबत शिरूर पो.स्टे.गु.र.नं. १२१/२१, भा.दं.वि.कलम 3७९ भोरवाडी. ता. जुन्नर, जि. पुणे येथून पिकअप जीप चोरी करून पारनेर पो.स्टे. हददीतून गायी चाराच प्रयत्नाबाबत पारनर पा.स्ट. यथ गु.राज.न. २१५/२०२१. भा.दंवि कलम 200000 कावळपिंपरी, ता.जुन्नर, जि.पुणे येथून चोरलेल्या MH-14-JE-2055 या दवाबत नारायणगाव पो.स्टे.गु.रजि.नं. १०८/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९ पारगाव तर्फे आळे गाव ता.जुन्नर, जि.पुणे येथून चोरलेल्या MH-16-CV.1595 या टॅक्टरबाबत नारायणगाव पो.स्टे.गु.रजि.नं. ७८/२०२१, भा.दं.वि ७) खरपुडी बु., ता. खेड, जि. पुणे येथून चोरलेल्या MH-14-DH-0768 या ट्रॅक्टरबाबत खेड पो.स्टे.गु.रजि.नं. १६९/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९, रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथून चोरलेल्या बोलेरो जीप नं. MH-14-EP-1549 बाबत मंचर पो.स्टे.गु.रजि.नं. १९०/२१, भा.दं.वि.कलम ३७९, पारगाव, ता. दौंड, जि.पुणे येथून चोरलेल्या MH-42-BB-4811 या ट्रॅक्टरबाबत यवत पो.स्टे. गु.रजि.नं. २५१/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९, बोरी बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे येथून चोरलेल्या MH-14-JA-8812 या ट्रॅक्टरबाबत आळेफटा पो.स्टे.गु.रजि.नं. ३४४/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९, ११) पेमदरा, ता. जुन्नर, जि. पुणे येथून २ जनावरे चोरीस गेलेबाबत आळेफाटा पो.स्टे.गु.रजि.नं.७१/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९, १२) राजापूर माठ, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर येथून चोरलेल्या MH-16-BZ-5249 या ट्रॅक्टरबाबत बेलवंडी पो.स्टे.गु.रजि.नं. १९६/२०२०, भा.दं.वि.कलम ३७९, १३) मौजे बेलवंडी गावचे हद्दीत बेलवंडी स्टेशन, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर येथून चोरलेल्या MH 16-AV-8896 या ट्रॅक्टरबाबत बेलवंडी पो.स्टे.गु.र.नं. ४५०/२१, भा.दं.वि.कलम ३७९ १४) ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर येथून चोरलेल्या MH-16-CQ-3503 या ट्रॅक्टरबाबत बेलवंडी पो.स्टे.गु.रजि.नं. ५७७/२०२०, भा.दं.वि.कलम ३७९, १५) ढवळगाव येथील इंडीया नं. १ मधील ए.टी.एम.चोरीचा प्रयत्न केलेबाबत बेलवंडी पो.स्टे.गु.रजि. नं. १८४/२०२१, भा.दं.वि.कलम ३८०,५११ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ढवळगाव येथे ए.टी. एम.फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. १६) ढोकी गावचे हद्दीत, ता. पारनेर, जि. अ.नगर येथून चोरलेल्या पिकअप गाडी नं. MH-16 AE-6264 चोरीबाबत पारनेर पो.स्टे. गु.रजि.नं. ८३/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९, १७) जवळा, ता. पारनेर, जि. अ.नगर येथून चोरलेल्या MH-16-AV-7271 या ट्रॅक्टरबाबत पारनेर पो.स्टे.गु.रजि.नं.७१/२०२१, भा.दं.वि. ३७९, १८) देवी भोईर येथे पतसंस्थेची भिंत फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केलेबाबत पारनेर पो.स्टे.गु.रजि.नं. ६८४/२०२०, भा.दं.वि.कलम ४५४,४५७,३८०,५११ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. उंडेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर येथून चोरलेल्या युनिकॉन गाडी नं. MH-13-DD-2096 हिचे चोरीबाबत बाशी तालुका पो.स्टे.गु.रजि.नं. ७५/२१, भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहेत २०) मौजे आळेफाटा येथील कांदामार्केट समोरील महालक्ष्मी स्टील दुकानासमोरून चोरीस गेलेल्या स्प्लेंडर मो.सा.नं. MH-14-FH-4684 हिचे चोरीबाबत आळेफाटा पो.स्टे.गु.रजि.नं.१८७/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. २१) ऑक्सीजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर चोरीस गेलेबाबत शिरूर पोलीस स्टेशन रोणे ग रजि.नं. ३६५/२०२१, भा.दं.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. असे एकुण २१ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.






