अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न,पिडितेला चालत्या रेल्वेमधून फेकले

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – गोवा ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, या रेल्वेमध्ये अल्पवयीन पिडितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. ही पिढीता जखमी अवस्थेत सकाळी साडे सातच्या समारास सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानकाजवळ जखमी अवस्थेत आढळली.

या अल्पवयीन पिडितेवर बलात्काराच्या प्रयत्नानंतर चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या ही पिडिता सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून संशयित म्हणून एका माजी सैनिकाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here