विक्की कौशलसोबतचे नाते कतरिना लवकरच जगजाहीर करणार

katrina-and-vicky

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल आपल्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे सध्या खूप चर्चेत आहेत. दोघांना बर्‍याच वेळा एकत्र पाहिले जाते. कधी हे दोघे एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात, तर कधी एकमेकांच्या घरी जाताना. आतापर्यंत दोघेही रिलेशनशिपच्या बातम्यांवर प्रतिक्रिया टाळायचे आणि एकमेकांना मित्र म्हणून संबोधत असत, पण आता अशी बातमी येत आहे की, हे दोघंही सर्वांसमोर आपलं नातं स्वीकारणार आहेत


टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कतरिना आणि विक्की एक कपल म्हणून आपले नाते जगजाहीर करण्यास तयार आहेत आणि लवकरच हे दोघेही सोशल मीडियावर पोस्ट करून याची घोषणा करतील अशी शक्यता आहे. तथापि, विक्कीच्या वडिलांना विक्कीने असे पाऊल उचलावे, अशी इच्छा नाही. असा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी विक्कीला इशारा दिला आहे.

रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, कतरिनाला विकीने त्याच्या को-स्टारसह इंटिमेट सीन करू नये असे वाटते आहे. विक्कीने यापूर्वी ‘मनमर्जिया’ आणि ‘लव्ह पर स्क्वेअर फीट’मध्ये लव्ह मेकिंग सीन्स दिले आहेत आणि कतरिनाला भविष्यकाळात विक्कीने असे सीन करू नयेत असे वाटते आहे.

असे म्हटले जात होते की, नवीन वर्षात दोघांनी आपल्या भावासह बहिणीबरोबर नवीन वर्ष एकत्र साजरे केले होते. कारण, त्यावेळी कतरिनाने बहिणीसमवेत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्या छायाचित्रातील आरशामध्ये विक्कीची झलकदेखील दिसली. फोटो व्हायरल झाल्यानंतर कतरिनाने तो डिलीट केला. यानंतर ट्विटरवर कतरिनाचा एक फोटो व्हायरल झाला आणि चाहत्यांनी असे म्हटले की, कतरिनाने विक्कीलाच मिठी मारली आहे. हा फोटो व्हायरल होत असतानाच ‘Vikkat’ हॅशटॅगही व्हायरल झाला होता (Katrina Kaif And Vicky Kaushal will going to make their relationship official).

कतरिनाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात कतरिनासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय कतरिना ‘फोन भूत’ आणि ‘टायगर 3’मध्ये ही दिसणार आहे. फोन भूतमध्ये कतरिनासमवेत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी आहेत. त्याचवेळी ‘टायगर 3’मध्ये सलमान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दुसरीकडे, विक्कीच्या व्यावसायिक जीवनाबद्दल जर आपण बोललो तर, तो ‘सरदार उद्यम सिंग’मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त तो माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सोबतही एका चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here