पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 30 जणांचा मृत्यू

इस्लामाबाद – आज सकाळी पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. डहारकी भागात दोन ट्रेनची एकमेकांना धडक बसल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.

समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या दुर्घटनेत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.

मिल्लत एक्स्प्रेस आणि सैय्यद एक्स्प्रेस या दोन एक्स्प्रेसची एकमेकांना धडक झाली. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here