म्यानमारमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्येही धक्के जाणवले

earthquake
File Photo

म्यानमार (वृत्तसंस्था) । म्यानमार पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास झालेल्या, या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जमीनीला धक्के बसू लागल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पळाले.

या भूकंपाचे धक्के केवळ म्यानमारपुरते मर्यादित न राहता, भारतामधील कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्येही जाणवले. काही सेकंद जमिनीला हादरे बसले. भूकंपानंतर लोक घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी थांबले. सध्या जिवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here