कोंबडी चोराच्या औलादीने तोंड सांभाळून बोलावे!

निलेश राणेंच्या गुलाबरावांवरील टिकेला धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांचे जोरदार प्रत्युत्तर

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – कोकणात कोंबड्या चोरी करून मोठ्या झालेल्या चोराच्या औलादीने तोंड सांभाळून बोलावे. लोकांनी नाकारलेले हे बाळगडू तोड आहे म्हणून कोणावरही बेछुट टिका करत आहेत. निष्ठा, त्याग आणि समर्पणातून प्रगतीचे शिखर काबीज करणाऱ्या ना.गुलाबराव पाटील यांच्यावर टिका करायची लायकी निलेश राणे यांची नाही. यापुढे जळगावात याल तर तोंड सांभाळून बोलायच असा इशारा देत आज धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी राणेंना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

दि.7 रोजी जळगाव येथील पत्रकार परिषदेत भाजपाचे माजी खा.निलेश राणे यांनी शिवसेनेचे उपनेते, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. वाळू चोर, सुपारी चोर म्हणत त्यांची लायकी काढली होती. गुलाबरावांवरील या टिकेने शिवसैनिकांमध्ये तिव्र असंतोष खदखदत आहे. धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आज शिवसैनिकांच्या या असंतोषाला वाट मोकळी करून दिली.

ना.गुलाबरावांना चोर म्हणणाऱ्या निलेश राणेंनी आधी आपला इतिहास अभ्यासावा. कोकणातील हऱ्या आणि नाऱ्या टोळीतील नाऱ्याचा उध्दार स्व.बाळासाहेबांनी केला. त्यांच्या पुण्याईवरच नाऱ्याचा नारायणराव झालेल्या व्यक्तीला महाराष्ट्राचे मुखमंत्रीपद मिळाले. मात्र, स्वार्थाने आंधळे झालेल्यांनी सत्तेसाठी गद्दारी केली हा इतिहास आहे. आता या गद्दाराच्या कर्तृत्वावर मोठी झालेली मुले शिवसेनेवर उठसूट हल्ला करून आपली राजकीय सोय लावून घेत आहेत. ना.गुलाबरावांची औकात काढणाऱ्या निलेश राणेंची स्वत:ची औकात काय आहे? हे त्यांनीच पहावे.

ना.गुलाबराव काय आहेत हे खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बाळासाहेब, शिवसेना आणि शिवसैनिकांवरील अढळ निष्ठा, नागरिकांची सेवा आणि पारदर्शी जिवन हीच ना.पाटील यांची ओळख असल्याचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी म्हटले आहे. गुलाबभाऊंनी राणे कुटूंबियांप्रमाणे वैद्यकिय महाविद्यालय, विद्यापिठ आणले नसतील. मात्र, कुणाची हत्या करण्याचे पातक त्यांनी केलेले नाही हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो. श्री.राणे यांनी काल ना.गुलाबरावांवर केलेली टिका ही वैफल्यातून होती हे त्यांच्या बोलण्यातूनच दिसत होते. राणे कुटूंबिय हे शिवसेना विरोधासाठीच ओळखले जाते. भाजपाचे स्थानिक नेतेही त्यांच्या मताशी सहमत नसतील. गुलाबभाऊ म्हणजे खुली किताब आहेत. त्यांच्यावर टिका करतांना निलेश राणे यांनी शब्द जपून वापरायला हवे होते. गुलाबरावांचे नाव कुणी ठेवले याचा शोध घेणार असल्याचे म्हणणाऱ्या राणेंनी पुन्हा जळगावात येवून अशी भाषा वापरली तर शिवसैनिक त्यांना त्यांची लायकी दाखविल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही शेवटी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here