बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – बाजार सावंगी पोलीसांनी तीन चंदनचोरांना जेरबंद केले असून, या चंदनचोरांकडून 1,38,000-/ रुपयाच्या चंदनासह, एक चारचाकी, दोन मोबाईल असा एकूण 4,58,000-/ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 09/06/2021 रोजी बाजारसावंगी पोलीस चौकीचे पोलीस अंमलदार संजय जगताप यांना त्यांच्या बातमीरांमार्फत बातमी मिळाली की, फुलंब्री किनगाव कडुन एक पांढऱ्या रंगाची टाटा मांझा क्रमांक एमएच -23-ई-8489 ही मध्ये तीन इसम येत असून त्यामध्ये चंदनाची लाकडे व गाभा आहे, सदरची माहिती पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांना दिली.
पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार संजय जगताप व पोलीस स्टाफ यांनी बाजारसावंगी येथील इंडीया नंबर वन एटीएम समोर नाकाबंदी करुन 15:30 वाजता वाहन क्रमांकएमएच -23-ई-8489 आडवली असता त्यामधील तीन इसम गाडी बंद करून इकडे तिकडे पळु लागले, सदर तिन्ही इसमांना पकडुन नाव गाव विचारता 1) रउफखाँ रशीदखाँ पठाण वय 30 वर्षे, 2) इरफान खाँ नवाजखाँ वय 23 वर्षे दोन्ही रा फाजलवाडी ता फुलंब्री जि औरंगाबाद, 3) जावेदखाँ नजीरखाँ पठाण वय 40 वर्षे रा आडगाव माहुली ता जि औरंगाबाद असे असल्याचे सांगितले, गाडीची पाहणी केली असता डिक्कीत तीन गोण्यामध्ये चंदनाची लाकडे व गाभा 69 किलो किंमती 1,38,000-/ रुपयांचे मिळून आले, सदरचे चंदनाची लाकडे हे कुंजखेडा ता कन्नड येथील चंदनाची खरेदी विक्री करणारे व्यापारी यांना विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले, सदर तिन्ही इसमांकडे 69 किलो चंदनाची लाकडे, टाटा मांझा क्रमांक एमएच -23-ई-8489 , दोन मोबाईल असा एकूण 4,58,000-/ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
संजय जगताप यांच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, सपोनि कोमल शिंदे, पोउपनि विजय वाघ, पोलीस हवालदार संजय जगताप, नवनाथ कोल्हे, पो ना विनोद बिघोत योगेश नाडे, पोलिस अंमलदार प्रकाश ठोकळ, होमगार्ड संतोष पूंड, जालींदर वेताळ यांनी केली आहे.






