कोतवाली पोलिसांनी केली दुचाकी चोरट्यास अटक

अमरावती (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – दुचाकी चोरी प्रकरणातील एका आरोपीस अटक करून कोतवाली पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

गौरव मुकेश भिमाणी (३१, अंबागेट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गोपालनगर येथील चेतन घुरड यांची दुचाकी ८ जून रोजी गुलशन टॉवर येथील अ‍ॅक्सीस बँकेसमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

तपास करण्यासाठी गुलशन टॉवर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गौरव भिमाणी यास अटक केली. त्याच्याजवळून दुचाकी तीन दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई कोतवालीचे ठाणेदार राहुल आठवले यांचेसह दुय्यम निरीक्षक विवेक राऊत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुदाम आसोरे, नारमोडे, अब्दुल कलाम अब्दुल कादीर, सागर ठाकरे, अमोल यादव, विनोद मालवे, इमरान अन्वर खान यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here