प्रेयसीची चाकू भोसकून हत्या केल्यानंतर सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

knief-attack

भोपाळ (मध्यप्रदेश) – इंदौर-बिलासपूर नर्मदा एक्स्प्रेसमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराने तुरुंगात आत्महत्या केली. जून महिन्याच्या सुरुवातीला 21 वर्षीय मुस्कान हाडा या तरुणीची हत्या करण्यात आली होती. धावत्या ट्रेनमध्ये चाकू भोसकून बॉयफ्रेण्ड सागर सोनीनेच तिची हत्या केली होती. आता सागरने तुरुंगात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. केंद्रीय जेल अधीक्षकांच्या प्राथमिक तपासानंतर दोन तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

एक जूनच्या रात्री इंदौर-बिलासपूर नर्मदा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या 21 वर्षीय युवतीची हत्या झाली होती. इंदौरमध्ये राहणाऱ्या मुस्कान हाडा हिची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. धावत्या ट्रेनमध्ये चाकूने भोसकून तिची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर पसार झाला होता. पोलिसांनी आरोपी सागर सोनीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सागर सोनी मुस्कानवर प्रेम करत होता. मात्र तिने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये कुठलीही बातचित होऊ शकत नव्हती. त्याच रागातून सागरने मुस्कानची ट्रेनमध्ये हत्या केली होती. अटक झाल्यानंतर सागरची रवानगी सिहोर तुरुंगात करण्यात आली होती. मात्र 7 जूनला त्याने तुरुंगातच आपल्या टीशर्टने गळफास घेऊन आत्महत्या केली. केंद्रीय जेल अधीक्षकांच्या प्राथमिक तपासानंतर दोन तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. सिहोर जेलचे उप कारागृह अधीक्षक पीएन प्रजापती यांच्या माहितीनुसार हलगर्जी बाळगल्याने दोघा तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here