दोंडाईचा वरवाडे नगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने विकासकामांना वेग….

जेसीबी मशीनच्या साहाय्याने भोगावती नदी पात्रातील काटेरी झुडपे व बाभूळ काढण्याला प्रथम प्राधान्यता…

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – येथे आज दिनांक १३ जुन २०२१ सोमवार रोजी माजी मंत्री आमदार जयकुमारभाऊ रावल साहेब व लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसाहेब नयनकुंवरजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने पाऊसाळ्याच्या पाश्वभुमीवर भोगावती नदीपात्र जेसीबी मशीन लावून स्वच्छ करण्यात आले आहे.

दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेत पावसाळ्यापूर्वी नाले सफाईसह अमरावती व भोगावती नदीपात्र स्वच्छ करण्याचे या अगोदरच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत ठरले होते.सदरची कामे वेगाने सुरू असून आज भोगावती नदीपात्रातील मोठमोठी बाभूळे व काटेरी झुडपे जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढून नदीपात्र स्वच्छ करून घेण्यात आले आहे.

dondaicha2

याप्रसंगी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नबूभाई पिंजारी, आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, माजी आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे, नगरसेवक भरतरी ठाकूर, संजय तावडे, सामाजिक कार्यकर्ते अहमद पिंजारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here