शिरपुर तालुका शिवसेनेतर्फे वृक्षारोपण

शिरपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेनाप्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूर तालुका शिवसेनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपुत, तालुकाप्रमुख दिपक चोरमले, अत्तरसिंग पावरा, तालुका संघटक योगेश सुर्यवंशी, शहरप्रमुख देवेंद्र पाटील, युवासेना तालुका युवाधिकारी अनिकेत बोरसे, विजय पावरा, उपतालुका युवाधिकारी जितेंद्र राठोड, सुकलाल पावरा, मसुदभाई शेख, पिंटुभाऊ शिंदे, महाराष्ट्र वाहतूक सेना शहरप्रमुख जितेंद्र पाटील, गणेश बिरारी, तुषार महाले, विजय पवार, दिनेश गुरव, दिलीप पावरा आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here