शिंदखेडा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा युवासेनाप्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा केला. रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पुढील वर्षी वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यांचा संकल्प शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सर्जेराव पाटील, विधानसभा संघटक गणेश परदेशी, तालुकाप्रमुख गिरीश देसले, ईश्वर पाटील, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, शहरप्रमुख संतोष देसले, प्रताप सिसोदे, माजी विधानसभा संघटक साहेबराव (छोटु) पाटील, शेतकरी सेनेचे चंद्रसिंग ठाकूर, शिंदखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे मेडीकल ऑफीसर डॉ.विनय पवार, डॉ.अश्विनी गिऱ्हे, अधिपरिचारीका श्रीमती पुनम तारु, युवासेनेचे तालुका प्रमुख प्रदीप पवार, दिपक मराठे, सुहास साठे, युवासेना शहरप्रमुख योगेश माळी, नितीन माळी, आबा ठाकरे, गणेश चकणे, दिनेश साळुंके, स्वीय सहाय्यक रुपेश मराठे आदी उपस्थित होते.







