कणकवली – येथील पोलीस ठाणे गु.र.222/2021 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम 65 (अ)(ई)81,83 प्रमाणे पोकॉ ६२८ वैभव बजरंग कोळी कणकवली पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष विठ्ठल शिंगाडे वय-35 राहणार रानबांबुळी, अोरोस तालुका -कुडाळ, अनस इब्राहीम चेअरडिएल, वय-37वर्षे, रा. भटवाडी,फेडरल बँक समोर, सावंतवाडी. मुळ रा वेलानगल्लुर, जि. त्रिशुर,राज्य-केरळ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक- दि.14/06/2021 रोजी 19.30वाचे सुमारास ओसरगाव टोल नाका येथे मुंबई गोवा जाणारे हायवे रोड वरती संशयास्पद वाटणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रकची चौकशी करुन तपासणी केली असता, ट्रकमध्ये विनापरवाना आपले आर्थिक फायद्यासाठी वाहतूक करताना आढळून आले.
त्यांचेकडून 1,98, 000/- 150 पुठ्ठ्याचे बॉक्स असून प्रत्येक बॉक्सवर National Disttilleries Corlim-Goa असे लिहिलेले आहे प्रत्येक बॉक्स मध्ये 750 मिली मापाच्या दारूने भरलेल्या सीलबंद प्लास्टिकच्या 12बाटल्या असून एकूण 1800 बाटल्या आहेत. प्रत्येक बाटलीवर इंग्रजीत GOLDEN ACE Blue fine WHISKY असे लिहिलेले लेबल आहे प्रत्येक बाटलीची किंमत 110/- रुपये मिळुन एकुण किं.सु. 66,000/- 50 पुठ्ठ्याचे बॉक्स असून प्रत्येक बॉक्सवर Nationals Distilleries Corlim-Goaअसे लिहिलेले आहे प्रत्येक बॉक्स मध्ये 750 मिली मापाच्या दारूने भरलेल्या सिलबंद प्लास्टिकच्या 12 बाटल्या असून मिळून एकूण 600 बाटल्या आहेत प्रत्येक बाटलीवर इंग्रजीतGOLD & BLACK XXX RUMअसे लिहिलेले आहे प्रत्येक बाटलीची किंमत 110 रुपये मिळून एकूण किं. सु. 8,00,000/- एक टाटा कंपनीचा ट्रक असून त्याचा चेसिस नंबरMAT457054B7A03713 व इंजिन नंबर497TC92AYY804179 असा आहे तसेच त्याच्या मागे व पुढेMH.04.EY.4567 या नंबरच्या नंबर प्लेट आहेत जुना वापरता किं.सु.मालाची एकूण किंमत – 10,64,000/-रूपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास सपोनि खंडागळे करत आहे.






