दोंडाईचा (प्रतिनिधी) – काल दिनांक १९ जुन रोजी संपुर्ण महाराष्ट्र राज्य भर शिवसेना वर्धापन दिवस साजरी करण्यात आला,त्याचं प्रमाणे शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा शहर शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिवस साजरी करण्यात आला.
शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून वंदन केले त्यानंतर ऍड, ज्ञानेश्वर पाटील यांची धनगर समाज संघर्ष समिती च्या वकील संघाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणुन नियुक्ती झाली म्हणून सत्कार केला तर, श्री ईश्वर पाटील, यांची नुकतीच शिवसेनेच्या विभागीय तालुका प्रमुख म्हणुन नियुक्ती झाल्याने सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन उपतालुका प्रमुख शैलेश सोनार यांनी केले तर शिवसेनेचे उपजिल्हा संघटक कल्याण आबा बागल, युवासेना चे तालुका प्रमुख आकाश कोळी, ॲड ज्ञानेश्वर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत संघटनेची पुढील वाटचाल कशी करावी या वर मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक कल्याण बागल, विभागीय तालुका प्रमुख ईश्वर पाटील,उपतालुका प्रमुख शैलेश सोनार,राका शेठ,उपशहरप्रमुख,आबा चित्ते,विजय वाडीले,दीपक मराठे राज ढोले प्रताप भाऊसाहेब ज्ञानेश्वर पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख आकाश कोळी,शहर प्रमुख सागर पवार,निखिल जयसिंघानी,लखन मराठे,अजय विसावे,चेतन साबळे,सुरेश कोळी रविंद्र सदाराव,विक्रम अहिरे,देवेंद्र अहिरे,दीपक काकडे,किरण कोळी,नितीन ठाकूर,नितीन माळी, जगदीश पाटील,संदीप ठाकुर,भुषण चौधरी, पंकज चैनांनी, मोहित राजानी, राहुल गिरासे,महिला आघाडीच्या विजया ताई ठाकुर,विजया मराठे,सुनंदा पवार व शिवसैनिक उपस्थित होते.



