नाशिक (विशेष प्रतिनिधी तन्मय गांगुर्डे) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मधे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणुन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. त्यानुसार २१ जून २०१५ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणुन जगभर साजरा होत आहे.
समाजामधे योग विषयी जागरुत्ता वाढावी आणि योगाचे महत्व लोकांना पटावे यासाठी दरवर्षी २१ जून रोजी संपुर्ण जगामधे योग दिवस साजरा केला जातो संपुर्ण जगामधे योगाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच योग आणि योग केल्याने आपल्याला होणारे फायदे या विषयी माहिती देण्यासाठी डिजिपी नगर मध्ये कार्यक्रम आयोजित आला.

कार्यक्रमाचे नियोजन प्रसाद ठाकरे, जितेंद्र पाटील, तन्मय गांगुर्डे पाटील यांनी केले सर्व डिजिपी नगर नागरिक यावेळी उपस्थित होते.






