शिंदखेडा (प्रतिनिधी) – वारुड येथे शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त महादेव मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील , शिंदखेडा विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, युवासेना तालुका युवाधिकारी प्रदीप पवार, माजी सभापती ललित वारुळे, पंचायत समिती सदस्य भगवान पिंपळे, वाहतूक सेना तालुका संघटक अशोक पाटील, विभागप्रमुख नंदु दोरिक, विशाल परदेशी, हेमंत भदाणे, पंकज बोरसे, अशोक सोनवणे, गोपाल, विनोद बोरसे हे उपस्थित होते. या शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भटू मिस्तरी, सुधाकर भदाणे, अमोल भदाने, पंकज सोनवणे, भैय्या बोरसे, भूषण सोनवणे, दीपक बोरसे, रावसाहेब पाटील, गट्टलू पाटील, नितीन शिरसाठ, प्रा.घनश्याम बोरसे, डॉ.शिंदे, अशोक बेहेरे, योगेश पगारे, गोपाल नागो दोरीक, गणेश बोरसे, योगेश खैरनार, महेश चौधरी, प्रवीण भामरे, सतीलाल सोनवणे, यावेळी सहभागी होते. सदर शिबिराचे आयोजन स्थानिक लोकाधिकार समिती जिल्हाध्यक्ष हिरालाल बोरसे, शिवसेना शाखा वारुड व अर्पण रक्तपेढी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर शिबिरात महिलांनी व अपंगांनी सहभाग नोंदवला.






