मुंबई (विशेष प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) – लालबाग परळचा बुलंद युवा आवाज युवासेना उपशाखाधिकारी अक्षय विजय गांवकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झोपडपट्टी वासियांना तसेच विभागीय नागरिकांना मास्क चे वाटप करण्यात आले.
कार्यसम्राट आमदार अजय चौधरींच्या उपस्थितीत आणि धिरज (सोनू)जैन (शिवडी विधानसभा उपविभाग अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी युवासेना शिवडी विधानसभा विभाग अधिकारी सुप्रित म्हात्रे, पत्रकार महेश्वर तेटांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा उपशाखाधिकारी – ओमकार पाटील, प्रथमेश चव्हाण, संकेत महाडिक, ओमकार धुरी, ओमकार साळुंखे यांचे विशेष सहकार्य लाभले.






