दोंडाईचा येथे बलिदान दिवसानिमित्त डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

मान्यवरांकडून डॉ. मुखर्जी यांचा जीवन प्रवास व अतुलनीय कार्याची माहीतीचा प्रसार

दोंडाईचा (प्रतिनिधी) – येथे आज दि.२३ जून २०२१ बुधवार रोजी भाजपा दोंडाईचा मंडळ व धुळे जिल्हा ग्रामीणच्या वतीने भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून बलिदान दिवसानिमित्त जनसंघाचे संस्थापक, अखंड भारताचे पुरस्कर्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस डी.एस. गिरासे, दोंडाईचा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी डाँ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जीवन प्रवास मांडून अतुलनीय कार्याची ओळख करून दिली.

याप्रसंगी दोंडाईचा न.प.चे उपनगराध्यक्ष नबु पिंजारी,आरोग्य सभापती कृष्णा नगराळे, माजी सभापती जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाले, माजी नगरसेवक जीतूभाऊ गिरासे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजूबाबा धनगर, शिंदखेडा मंडळ सरचिटणीस के. पी. गिरासे , राकेश अग्रवाल, नरेंद्र बाविस्कर आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here