महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ.नानासाहेब पटोले उद्या दोंडाईच्यात

कार्यक्रम स्थळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन-माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख

दोंडाईचा (प्रतिनिधी) – येथे उद्या दिनांक २४ जुन गुरूवार रोजी सकाळी ११.०० वाजता दोंडाईचा येथील सौरभ मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ.नानासाहेब पटोले हे कार्यकर्ते व शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत.या कार्यक्रमास शिंदखेडा तालुक्यातील तसेच दोंडाईचा शहरातील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी मंत्री डॉ नानासाहेब हेमंतराव देशमुख यांनी केले.

यावेळी दौऱ्याबाबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यानी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष यांच्या दौराचे उद्या सकाळी दहा वाजता शिरपूर येथुन सुरुवात होईल व शिंदखेडा मार्गे विरदेल, चिलाणे, धमाणे,बाम्हणे मार्गे शहरात आगमन होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीने प्रतिमेस माल्यार्पण तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे कोवीड केअर सेंटरला भेट देऊन तेथून सौरभ मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी आदरणीय नानासाहेब पटोले, कार्याध्यक्ष आमदार कुणाल बाबा पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी कृपया सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनेउपस्थित राहावे ही कळकळीची विनंती माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब पवार, माजी उपनगराध्यक्ष रामभाऊ काका माणीक, माजी नगराध्यक्ष प्रदीप वाणी, गिरधारी रामराख्या, हेमराज नाना पाटील, जब्बार बागवान ,भटु तात्या, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, सुनील चौधरी, दीपक अहिरे ,प्राध्यापक विशाल पवार,अँड. मुन्ना मराठे ,राहुल माणिक, कल्लू पठाण, वसंत कोळी, मुन्ना खाटीक,छोटुभाऊ सोनवणे, राजू बापू देशमुख ,नितीन देसले, हुसेन बोहरी आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here