- केन्द्र सरकारने नोटाबंदी,जीएसटी यासह इतर निर्णय घेऊन देशातील जनतेचे कंबरडे मोडले
- विखरण येथील शहीद शेतकरी धर्मा पाटील यांनीतत्कालीन भाजपा सरकारने न्याय दिला नाही
दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – जेव्हा पासुन केन्द्रात भाजपाचे सरकार आले आहे. तेव्हापासून नोटाबंदी, जीएसटी,शेतकरी कायदा,घरगुती गँस सिलेंडर अनुदानसाठी बँकखाते उघडण्यासह इतर विविध घेतलेल्या निर्णयामुळे जनतेचे वाटोळे झाले असुन,सर्वसामान्य गरिब माणसांचे तर कंबरडे मोडले गेले आहे. म्हणून विखरण येथील शहीद शेतकरी धर्मा पाटील यांना तत्कालीन भाजपा सरकारने उर्जा प्रकल्पात न्याय देता आला नाही. त्यावेळी धर्मा पाटील यांनी कायद्याची व सरकारी यंत्रणेची पोलखोल करून टाकली होती. म्हणून भाजपाच्या काळात त्यावेळी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले होते.काग्रेस पक्षाने कधीच सत्तेचा उपयोग खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी व जनतेला कोणत्याही प्रकारे छळण्यासाठी केला नाही.उलट भाजपा पक्ष जनतेचा शत्रू असुन लोकांना आता येणाऱ्या काळात सत्तेत काग्रेस पक्ष आणण्याची गरज असल्याचे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले.
दोंडाईचा-नंदुरबार रस्त्यावरील सौरभ मंगल कार्यालय येथे घेतलेल्या शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात, सुरूवातीला करोना काळात अहोरात्र मेहनत घेत. रूग्णांची सेवा करणाऱ्या आशा वर्कर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १९७१ भारत पाकिस्तान लढाईत विजय मिळवून देणाऱ्या माजी सैनिक युसूफ खाटिक यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपल्याला मिळालेले सर्व शौर्य पदक शासनाला परत केले होते.यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला.तसेच कार्यक्रम स्थळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, दोंडाईचा शहराध्यक्ष वंसत कोळी आदी उपस्थित होते.

यावेळी शिंदखेडा तालुका युवक काँग्रेस व युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक यांच्या हस्ते आ.नानासाहेब पटोले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हेमराज पाटील, जोगशेलूचे सरपंच ज्योती नितीन देसले, निमगुळ सरपंच बापू उरसा भील, चंद्रकांत शिरसाठ, विखरणचे माजी सरपंच शिवाजी पाटील, उपसरपंच उमेश पाटील,संदिप पाटील, साहेबराव सोनवणे, अधिकार देवरे, दिनेश देवरे, दिनेश देसले,अभय पाटील, शामकांत पाटील, वीरेंद्र गोसावी, रामकृष्ण धनगर ,भोजैसिंग गिरासे, विश्राम खैरनार,दामू चव्हाण, आसाराम बील,रतिलाल पाटील, कांतीलाल पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नानाभाऊ सोनवणे, सरपंच शांताराम भदाणे भानुदास भदाणे,हुंबर्डेचे सरपंच गोकुळ पवार, बाबा पवार, अमृत पवार, सुरेश पवार, भिमराव मोरे, करनी सेनेचे महामंत्री राजू देशमुख, डॉ. जयंतराव बोरसे, माजी.जि.प.सदस्य रमेश आहिरराव, उत्तम देसले, डॉ. तुषार शेवाळे, राजाराम पानगव्हाणे, नासिक सातारवाडा सयपंच डॉ. अनिल पवार, मा.खासदार मोहन जोशी, प्रा.शरद पाटील, भाई नगराळे, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, नगरसेवक जितेन्द्र मराठे, पांडुरंग माळी, प्रमोद सिसोदे, दरबारसिंग गिरासे, अतुल लोंढे,विनायक देशमुख, शाम पांडे, बापू चौरे, हाजी मसुद खाटीक, वाजीद सैयद,प्रवीण पवार, रंजाणेचे माजी सरपंच महेंद्र गिरासे, विकासो चेअरमन धर्मराज पाटील, जगन्नाथ ढोले, प्रदीप पाटील, प.स.सदस्य राजेन्द्र देवरे, प्रा.विशाल पवार, डोंगरगाव सरपंच प्रकाश पाटील, शिंदखेडा नगरसेवक सुनील चौधरी, दीपक आहिरे, दोंडाईचा शहर काग्रेस पुष्पक पाटील, अँड. प्रमोद मराठे, कल्लु पठाण, हुसेन बोहरी, पंकज चोळके, मधुकर चौधरी, भारत जाधव, सचीन सोनवणे, मोनू शेख, मोना सजाऊद्दीन, गोल्डी माणीक, सागर नगराळे, पप्पु सुतारे, गणेश चकणे, सचीन परदेशी, मनोज रामोळे, मुन्ना खाटीक, अय्याज बागवान, सुनील माणीक, युवराज काकडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ. श्री नानासाहेब पटोले म्हणाले की, केन्द्रातील भाजपा मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे.आजपर्यंत त्यांनी एकही निर्णय शेतकऱ्यांचा हिताचा घेतलेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची त्यांना रद्दीभरही चिंता नाही. तसेच देशात राबवलेला नोटाबंदी, जीएसटी, घरगुती गँस वापरतांना अनुदान मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला बँकेत लाईनीत उभे करून खाते उघडणे. यासह अनेक निर्णय जनतेच्या अहिताचे असुन, त्यामुळे जनतेचा फायदा कमी व नुकसान जास्त होत. सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले गेले आहे. विखरण येथील शहीद धर्मा पाटील यांनाही उर्जा प्रकल्पात जमीन अधिग्रहण करतांना दुजाभाव करण्यात आला. ते आपले पक्षाचे व सरकारचे पितळ उघडे करतील. म्हणून ह्या भागात खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू करण्यात आली. त्यामुळे जनता भयभीत होत.येथील अन्याय विरोधातील वातावरण तापलेले आहे. ओबीसी समाजालाही आरक्षणापासुन याच सरकारने ताटकळत ठेवत,ओबीसींचा राजकीय खुन केला आहे. केन्द्रातील मोदी सरकार भयावह, हुकूमशाही पद्धतीमुळे देशाला संपवू पाहत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची जीडीपी ७.३ पर्यंत खाली आली आहे. भगोडे,लुटारूं कर्जदांराना मुबा व सर्वसामान्य कर्जदांराना शिक्षा,अशा चुकीच्या धोरणामुळे येणाऱ्या काळात देशात काग्रेसचे सरकार आणण्यापलीकडे जनतेला पर्याय नसल्याचे सुतोवाच त्यांनी शेवटी दिले.
यावेळी काग्रेसचे माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, आमदार श्री कुणालबाबा पाटील, जिल्हाध्यक्ष शामभाऊ सनेर आदींची भाषणे झालीत. डॉ. हेमंतराव देशमुख व शामभाऊ सनेर यांनी आपल्या भाषणात शिंदखेडा तालुक्यात कशा पद्धतीने खोटे गुन्हे दखखल करण्यात आले. त्यात बालिका अत्याचार प्रकरण,टाकरखेडा येथील अनिता गिरासे परिवारावर दाखल गुन्हा, यासह विविध दाखले देण्यात आले.



