औरंगाबादमधील रंजनवन सोसायटीत घरातून ऐवज लंपास

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – घराला कुलुप असल्याची संधी साधत चोरट्याने घरफोडी करत मोबाइलसह किंमती ऐवज लंपास केला तसेच घरासमोर पार्क असलेली एक दुचाकीही चोरली. चोरट्याने एक कार चोरण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीही ही घटना सिडको एन ९ येथील रंजनवन हौसिंग सोसायटी येथे घडली. गुरुवारी सकाळी सात वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. गणेश सारडा (रा. रंजनवन हौसिंग सोसायटी) हे २३ जून रोजीपासून बालाजी दर्शनासाठी गेले आहेत. घराला कुलूप असल्याची संधी चोरट्याने साधली. चोरट्याने घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडले आणि एक मोबाइलसह अन्य साहित्य लंपास केले. घरात ठेवलेली कारची चावीही चोरट्याच्या हाती लागली. घरासमोर पार्क केलेली कार चोरट्याने चावीने सुरु केली पण, कार चोरी करण्याचा प्रयत्न त्याचा फसला. त्यामुळे चोरट्याने सारडा यांच्या घराशेजारीच पार्क असलेली दुचाकी लांबवली.

माहिती मि‌ळताच सिडको पोलिसांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांनी घरातून अन्य कोणत्या वस्तू चोरल्या याचा तपशील सारडा हे आल्यावरच समजू शकतील, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here