मुंबई (संपादक सुनिल पाटील) – विलेपार्ले पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 488 /2021 कलम 302 397 34 भादवी हा गुन्हा दिनांक 22 /6 /2021 रोजी ३ रा मजला, जाल हॉटेल विलेपार्ले (पूर्व) मुंबई या पडक्या इमारती मध्ये घडला आहे. दोन अज्ञात आरोपींनी मयत जिगर सुरेश चावडा वय 23 वर्षे याच्या डोक्यात लाकडी ठोकळयाने व दगडासारखे हाताने गंभीर दुखापत करून त्याचा खून करुन त्याला बेसमेंट मध्ये फरपडत नेहुण टाकून त्याचा मोबाईल फोन घेऊन पळून गेले होते.
सदर गुन्ह्यात केलेल्या तपासामध्ये दोन्ही आरोपी हे कचरा वेचणारे असल्याचे निष्पन्न झाले. परंतु त्यांचा कोणताही ठावठिकाणा उपलब्ध नव्हता किंवा त्यांच्या वर्णनाबद्दल काहीच माहिती मिळून आली नव्हती. अशा परिस्थितीत तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीव भोसले, पोलीस उपनिरीक्षक पटेल गुन्हे प्रकटीकरण पथकाचेमहाडेश्वर, चिपकर, महाले, कांबळे, पडवळ, लोंढे, राठोड, दिवानजी, संतोष कांबळे, तांबे, गायकवाड, खंदारे, शिंदे यांनी अत्यंत मेहनतीने, कसोशीने, चिकाटीने केलेल्या प्रयत्नांची ४० कचरावेचनारे इसमांकडे केलेल्या चौकशी मध्ये पहिला आरोपी जमील अहमद अन्सारी वय ४५ वर्ष हा दिनांक 24/06 /2021 रोजी मिळून आला.
त्यानंतर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी नागपाडा ते दहिसर पर्यंतचे शेकडो कचरा वेचणारे, भिकारी, भंगार विकत घेणारे अशा इसमांकडे विलेपार्ले पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार तसेच पार्लेकर पोलीस मित्र मधील महिला व पुरुष यांच्या सहकार्याने या गुन्ह्यातील दुसरा आरोपी रितेश विलास मारू वय ३६ वर्ष यास आज दिनांक 26/6/2021 रोजी कांदिवली (पश्चिम) येथून ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपासात विशेष बाब म्हणजे या गुन्ह्यातील जखमी मयत जीगर सुरेश चावडा वय २३ वर्ष याच्यावर सात गुन्हे दाखल असून त्यामध्ये 307 सारखा गंभीर गुन्हा सुद्धा नोंद आहे व तो साकीनाका येथून तडीपार होता. आरोपींच्या विषयी कोणतीच माहिती नसताना अज्ञात आरोपीने खुनाच्या गुन्ह्यामध्ये ३ दिवसात चिकाटीने मेहनत घेऊन पहिला आरोपी सॅंडहरसट रोड या ठिकाणी व दुसरा आरोपी ५ दिवसात कांदिवली (प) येथुन शोधून काढला.
संपूर्ण मुंबई मध्ये केलेल्या कसोशीने तपास यामुळेच विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदार यांना यश मिळाले आहे. नमूद गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री संदीप कर्णीक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ श्री मंजुनाथ सिंगे, सहाय्यक पोलीस आयुक्त वाकोला विभाग श्री अविनाश धर्माधिकारी व विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अलका मांडवे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे.






