विवाहापूर्वीचे समुपदेशन

    विवाहापूर्वीचे समुपदेशन खरंच इतकं आवश्यक आहे का? विचार करा बरं. असं पहा ,जर लग्नानंतर समुपदेशन आवश्यक आहे तर मग लग्ना पूर्वी समुपदेशन घेणे नक्कीच गरजेच आहे. विवाह पश्चात कोणत्याही अडचणी येऊ नये, तसेच अडचणी आल्या तर त्यांचे निवारण सहजगत्या करता यावं यासाठी विवाह पूर्व समुपदेशन फार गरजेच आहे

    आता हे समुपदेशन कोणास करायचे. वरील वाक्यातच उत्तर आहे. म्हणजे ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांचं समुपदेशन करणं खूप गरजेच आहे. म्हणजेच विवाहयोग्य मुलगा आणि मुलगी यांचे समुपदेशन होणे खूप गरजेचे आहे. आता हे समुपदेशन नक्की कोणी करायचे? नक्कीच याचा विचार मात्र खूप सावधपणे करायला हवा. कोणीही येतोय समुपदेशन करतय. असं मात्र चालणार नाही. तज्ञ व्यक्तीने मुलांचे – मुलींचे समुपदेशन करावे… हे जर का भान ठेवलं नाही ना तर त्याचा हेतूच सफल होत नाही.

    विवाह संस्था ही भारतातील प्राचीन व प्रगत संस्था आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. विवाह पश्चात मतभेद होणे अपेक्षित आहे पण मनभेद नकोत, प्रॉब्लेम्स नकोत. आपल्या प्रत्येकातच काही ना काही इश्युज असतात, त्यात इगो , अहंकार , अपेक्षा , हेतू, जमा केले की प्रॉब्लेम्स तयार होतात.

    विवाह पश्चात असोत किंवा विवाहानंतर असो, मुलगा आणि मुलगी यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. काय काय प्रश्न असतात बरे=, विवाह बंधन की मुक्तपणा, विवाह हेतू, अपेक्षा राहणीमान, मुलं ,पैसे, कुटुंब सदस्य, एकमेकांना देण्यात येणारी स्पेस, शारीरिक संबंध, धर्म , एकमेकांचे सहकार्य, विरोधाची कारणे इत्यादी अनेक विषय हाताळले जाऊ शकतात.

    आपण आजही विवाह संस्था असे म्हणतो. आणि नक्कीच असे म्हणजे दोन संस्था एकत्र येणार असतात, आणि नक्कीच दोन संस्थांमध्ये काहीतरी भेद असणारच. आचार-विचार ,आदान-प्रदान , संस्कृती, राहणीमान यात फरक असणारच. जाती, धर्म , समाज, व्यक्ती, वेगळी माणसे, वेगळा देश, वेगळ्या संस्था, एकत्र येणार म्हणजे नक्कीच काहीतरी तर वेगळेपण असणारच, त्याचं वादात रूपांतर होऊ नये व सौख्या ने दोघांनी पुढे जावे हीच आपली अपेक्षा आहे ना. मग त्यासाठी निश्चितच दोघांनीही समजून घेणे गरजेचे आहे. आणि ते त्यांना समजावून सांगण्याकरता समुपदेशन ही संकल्पना उदयाला आली.

    तुमचं काय मत आहे विवाहापूर्वी या सगळ्याचा विचार व्हायला हवा का नको. नक्कीच मला माहित आहे की तुम्हाला ही मान्य आहे , मग ते शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे गरजेच आहे याकरताच हा सारा खटाटोप. यालाच आपण आता विवाहपूर्व समुपदेशन म्हणजेच थोडक्यात पीएमसी म्हणूया. ( प्री मॅरेज कॉन्सीलिंग ) आता पण दुसऱ्या अँगलने विचार करू या बर का. जुने जाणते म्हणतात आमच्याकडे कुठे होत हे कौन्सिलिंग . तुमच्याही मनात हाच विचार आला ना ! खरंच आहे, मात्र काही गोष्टी विवाह पश्चात सुकर होण्यासाठी आता आपण तयारी करणार आहोत.

    विवाह पूर्व कॉन्सीलिंग कोणी करावे ? जी व्यक्ती विवाह समुपदेशक आहे अथवा त्यातील तज्ञ आहे त्या व्यक्तीनेच अशा प्रकारचे समुपदेशन करावे .विवाहापूर्वी वधू अथवा वर काय काय विचार करतात, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, स्वप्नमय दुनियेत जगत असतील तर त्यांना त्या जगातून बाहेर काढून सत्यात आणणे गरजेच असत . विवाहपूर्व समुपदेशन अत्यंत गरजेचे आहे . विवाहपूर्व समुपदेशनाचा हेतू, त्याचा विस्तार, यशस्वी विवाहाची गुरुकिल्ली, या सर्व गोष्टी आपण पुढच्या भागात पाहू….
    क्रमश …….

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here