जम्मू काश्मीरमध्ये २४ तासात पाच दहशतवादी ठार

पुचलमध्ये ६ तासांच्या चकमकीनंतर दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : जम्मू काश्मीरमधील पुलवामा भागातल्या पुचल मध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक सुरु आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेली चकमक अद्यापही सुरु आहे. घटनास्थळी भारतीय सैन्य, निमलष्करी दले, अग्निशमन दल आणि राज्य पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या जवानांनी या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटली नाही आहे.

राजौरीमध्ये भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. यात पाकिस्तानचा दहशतवादी ठार झाला आहे. बुधवारी राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेत (एलओसी) घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार केले. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. या चकमकीत दोन सैनिकही जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून एक एके ४७ रायफल, चार एके ४७चे मॅगजीन आणि दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here