बॉलिवूडमध्ये ईशा देओलचं कमबॅक

‘रुद्र : द एज ऑफ डार्कनेस’ या वेबसिरीजमध्ये अजय देवगणसोबत दिसणार

मुंबई (गणेश तळेकर) : बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी काही काळानंतर बॉलिवूडमध्ये काम करणं बंद केलं आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री ईशा देओल अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा हिने 2002 साली ‘कोई मेरे दिलसे पुछे’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

ईशा काही काळ बॉलिवूडमध्ये फार सक्रिय होती. ‘धूम’ सारख्या सुपरहिट चित्रपटांत तिने काम केलं आहे. २०१२ साली तिने भारत तख्तानी याच्याशी विवाह केला होता. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. तिला 2 मुलंही आहेत. त्यामुळे तिने कुटुंबासोबतच जास्तीत जास्त वेळ घालवणं पसंत केलं होतं. पण आता ती कमबॅक करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ती कमबॅक करणार आहे. ‘रुद्र : द एज ऑफ डार्कनेस’ या सीरिजमध्ये ती दिसणार आहे. डिस्नी प्लस होटस्टारची ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.जवळपास एका दशकानंतर अभिनेत्री इशा देओल आणि अजय देवगण एकत्र झळकणार आहेत. तर ईशा ही अनेक वर्षानंतर पडद्यावर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अजयने या सीरिजची घोषणा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here