मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री, तर अश्विनी वैष्णव रेल्वेमंत्री
नवी दिल्ली (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : केंद्रातील मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आरोग्य मंत्रालय आता मनसुख मांडवीय यांना देण्यात आलं आहे. तर अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्री पद देण्यात आलं आहे. याआधी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
मंत्र्यांची खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (अतिरिक्त भार)
मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्री, रसायन मंत्री
अमित शाह – सहकार मंत्री (अतिरिक्त भार)
ज्योतिरादित्य सिंदिया – हवाई वाहतूक मंत्री
अनुराग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री, युथ अफेअर्स
हरदीप पुरी – नागरी विकास, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्री
नारायण राणे – मध्यम व लघु उद्योग मंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री
पियुष गोयल – उद्योगमंत्री
स्मृती इराणी – महिला व बाल कल्याण मंत्री
सरबानंद सोनोवाल – बंदर आणि जलवाहतूक मंत्री, आयुष मंत्रालय
पशुपतीकुमार पारस – अन्न प्रक्रिया मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री
पुरुषोत्तम रुपाला – मासेमारी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री






