नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांसाठी UGC NET जून २०२६ ची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) हा निर्णय घेतला आहे. पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. विशेष म्हणजे NTA नं २२ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत ८७ विषयांसाठी UGC-NET जून २०२६ परीक्षा घेतली. ही परीक्षा ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप’ (JRF), सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी पात्रता आणि पीएचडी (PhD) प्रवेशासाठी घेण्यात आली होती.
UGC-NET June 2026, conducted by the National Testing Agency (NTA) | In respect of three subjects, namely English, Commerce, and Sociology, NTA had received several complaints on multiple errors in these papers. Accordingly, NTA formed a committee to enquire into and look into… pic.twitter.com/urFtbfONCd
— ANI (@ANI) August 16, 2026
प्रश्नपत्रिकांमध्ये आढळल्या गंभीर त्रुटी : NTA च्या मते, इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये वस्तुस्थितीविषयक, टायपिंग, भाषांतर आणि व्याकरणाशी संबंधित त्रुटी आढळून आल्या आहेत. याव्यतिरिक्त, प्रश्नांच्या शब्दरचनेतील दोष, अभ्यासक व पुस्तकांच्या नावांचं चुकीचं स्पेलिंग, प्रश्नांची पुनरावृत्ती आणि प्रस्थापित संकल्पनांसाठी अ-प्रमाणित संज्ञांचा वापर यांसारख्या त्रुटीही निदर्शनास आल्या आहेत. या कारणांमुळे, NTA नं या तीन विषयांसाठी UGC-NET परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.







