युक्रेनचा रशियावर भीषण ड्रोन हल्ला; ६ जणांचा मृत्यू

युक्रेन

मॉस्को (वृत्तसंस्था) । युक्रेनने रविवारी रशियावर जोरदार हवाई हल्ला केला. शेकडो ड्रोनचा वापर करून रशियावर आतापर्यंतच्या सर्वात मोठा हवाई हल्ला केला असून क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त केलाय. या हवाई हल्ल्यात रशियातील ६ जणांचा मृत्यू झालाय रशियाविरुद्ध कीव्हने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक प्रतिहल्ला ठरलाय.

सोशल मीडियावर या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, युक्रेनने पोदोल्स्कमधील रशियातील सर्वात मोठ्या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्या कंपनी असलेल्या ‘वाइल्डबेरीज’च्या एका गोदामाला लक्ष्य केलंय. या हल्ल्यानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट उठताना दिसले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी रातोरात युक्रेनचे ८२२ ड्रोन नष्ट केले. दरम्यान, रशियाने १५-१६ ऑगस्टच्या रात्री युक्रेनवर अनेक हवाई हल्ले केलेत. या हल्ल्यांमध्ये एका स्टील प्लांटमधील दोन जण ठार झाले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अलीकडील हल्ल्यांमध्ये त्यांनी देशभरात युक्रेनचे ८२२ ड्रोन पाडलेत. मॉस्को क्षेत्राचे गव्हर्नर आंद्रे वोरोब्योव्ह यांनी सांगितले की, संघर्ष सुरू झाल्यापासून मॉस्को क्षेत्रावर झालेल्या युक्रेनच्या सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात ८३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. पोडोलस्क भागात अनेक लोक जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here