तेलाच्या सुपर टँकरचा मोठा स्फोट; होर्मुझची सामुद्रधुनी बंद

सुपर टँकरचा मोठा स्फोट

इराण (वृत्तसंस्था) | २० लाख बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल वाहून नेणारा एक सुपर टँकर महत्वाच्या जलमार्गातून जाण्याचा प्रयत्न करत असतांना एका सागरी सुरुंगाला धडकला आणि त्याला आग लागली. या मार्गावरून जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे जगातील सर्वात महत्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी आता सागरी वाहतुकीसाठी बंद झाले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने हे स्पष्ट केले आहे.

 

इराणी सरकारची वृतसंस्था IRNA ने IRGC नौदलाच्या इशार्‍याचा हवाला देत म्हटले आहे की, सर्व देशांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यास मनाई आहे. इराणी नौदलाचा संदर्भ देत या संस्थेने म्हटले आहे की, “होर्मुझ बंद आहे आणि विविध देशांच्या जहाजांना त्यातून जाण्यास मनाई आहे.”

IRGC नुसार, कच्चे तेल वाहून नेणारा सुपर टँकर तेहरानने अधिकृत न केलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत होता आणि एका सागरी सुरूंगाला धडकला असे वृत आहे. यावेळी जहाजात स्फोट झाला आणि त्याला आग लागली.

इराणी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने होर्मुझची सामुद्रधुनीतील पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहील असे स्पष्ट केले आहे. मध्यपूर्वेतील या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती भडकण्याची आणि जागतिक ऊर्जा संकट निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here