जावा समुद्रात २४० प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी जहाज अचानक बेपत्ता

जावा समुद्रात

इंडोनेशिया (वृत्तसंस्था) । इंडोनेशियातील जावा समुद्रात रविवारी २४० प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी जहाज अचानक बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘व्हार्गो ट्रान्सपोर्ट ८’ असे या जहाजाचे नाव आहे. ते पूर्व जावामधील सुराबाया शहरातून बोर्नियो बेटावरील दक्षिण कालीमंतन प्रांताची राजधानी असलेल्या बंजारमासिनकडे जात होते. प्रवासादरम्यान अचानक हवामानात बदल झाल्यामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे जहाजाचा किनार्‍यावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाजाचे शेवटचे स्थान बंजारमासिन किनाऱ्यापासून सुमारे 148 किलोमीटर अंतरावर जावा समुद्रात नोंदवले गेले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकांनी समुद्रात तातडीने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. बंजारमासिन बचाव संस्थेचे कार्यप्रमुख अरियांतो अर्दी यांनी जहाजाशी संपर्क तुटल्याची पुष्टी केली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि मदतकार्य वेगाने राबवण्यासाठी त्रिशक्ती येथे एक विशेष ऑपरेशन पोस्ट स्थापन करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here