वाखरी येथे कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

सुधाकरपंत परिचारक

पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त आज, सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी वाखरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

प्रशासकीय कार्यालय, वाखरी येथे सकाळी ९:०० ते दुपारी २:०० या वेळेत हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे. “रक्तदान – महादान” आणि “रक्तदान करा, जीव वाचवा” या संदेशाखाली समस्त पांडुरंग परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पवित्र कार्यात पांडुरंग परिवारातील सर्व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन समस्त पांडुरंग परिवार, दि पंढरपूर अर्बन को-ऑप. बँक लि.पंढरपूरचे चेअरमन सतीश मुळे, व्हा.चेअरमन माधुरी जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे व सर्व संचालक मंडळ, सेवकवर्गातर्फे करण्यात आले आहे.

सुधाकरपंत परिचारक सुधाकरपंत परिचारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here