नाशिक (उपसंपादक चांगदेव पवार) |शहरातील नाशिक रोड भागातील गोसावी वाडी चौफुलीवर असलेल्या पानटपरीसमोर गोळीबाराची घटना झालीय. पानटपरीसमोर उभ्या असलेल्या ३२ वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला असून तरुण गंभीररित्या जखमी झालाय.
सुमित पगारे असं हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुमितला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाती आलेल्या महितीनुसार, सुमित पगारे हा गोसावी वाडी चौफुलीवरील एका पानटपरीसमोर उभा होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. सुमितच्या पोटात या दोन्ही गोळ्या घुसल्या असून तो गंभीररित्या जमखी झालाय.
गोळीबार घडल्याची माहिती मिळताच शहरातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत हल्लेखोर आणि गोळीबारामागील कारणाचा शोध घेतला जातोय. पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जुन्या वादातून गोळीबार झाला असावा. गोळीबाराच्या घटनेने गोसावीवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरलंय.







