नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून राज्यातील मराठी शाळेत शिक्षण घेऊन पुढे गेलेल्या माजी शालेय विद्यार्थ्यांना सन्मानाने शाळेत बोलावून त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी १९६० सालापुर्वी शिकत असलेल्या व पुढे मराठी शाळेत शिकुन नावारूपाला आलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी शाळा माझा अभिमान अभियानांतर्गत माजी विद्यार्थी मेळावा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा विठेवाडी तालुका देवळा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,कार्यक्रमाचे अध्यक्ष,१९७०/७१ चे माजी विद्यार्थी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक श्री कुबेर बापु जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता,
याप्रसंगी ज्ञान मंदीरात सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री संजय आहेर यांनी केले, मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी श्री पंडित बापू निकम, विठोबा सोनवणे, भास्कर निकम, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र निकम, सोसायटी संचालक शशिकांत निकम, मा सरपंच रावसाहेब निकम, टिंकु निकम, अभिजीत निकम, रवींद्र निकम, महेश आहेर, प्रमोद निकम, साहेबराव सोनवणे,ईश्वर निकम, अरुण निकम, अमोल निकम, स्वप्निल निकम, केदारनाथ कोकरे, सुभाष मेरे, दीपक निकम, सचिन निकम माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुबेर जाधव यांनी ७० ते ७४ साली याच शाळेत शिकुत असताना त्यावेळच शिक्षण आणि शिस्त तसेच शिक्षकाचा आदरयुक्त दरारा या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडित निकम यांनी १९६० ते ६५/ साली या शाळेत शिकुत असतानाचे अनुभव कथन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका योगिता कापडणीस शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव आहेर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
फोटो – माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करताना मा विद्यार्थी कुबेर जाधव, पंडित निकम, शशिकांत निकम व इतर मान्यवर







