लखीसराय (वृत्तसंस्था) । जिल्ह्यातील ‘अशोक धाम’ येथे चेंगराचेंगरीची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, या घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे; मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ‘जलाभिषेक’ करण्यासाठी सुमारे ५०,००० भाविक तिथे जमले होते, त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली.
चेंगराचेंगरीनंतर भाविक घाबरून धावू लागले आणि अनेकजण एकमेकाखाली चिरडले गेले. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







