बिहारमध्ये सहा मुलांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

gangrape
File Photo

खगारिया (बिहार) (वृत्तसंस्था) । येथे अवघ्या १४ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच सहा तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या अमानुष घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून गावकरी संतप्त झाले आहेत.

मुलीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आपल्या ओळखीच्या एका तरुणाच्या बोलावणीवर घराबाहेर गेली होती. त्याने तिला दुचाकीवर बसवून गावाच्या धरणाकडे नेले. तेथे तिला एका ड्रिंकमध्ये नशेची गोळी मिसळून पाजण्यात आली. औषधाचा परिणाम झाल्यानंतर मुलगी बेशुद्धावस्थेत जात असतानाच त्या तरुणासह आणखी पाच जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केला. घटना घडल्यानंतर आरोपी तिला अर्धमेल्या अवस्थेत सोडून पळून गेले.
संपूर्ण रात्र ती मुलगी धरणावर बेशुद्धावस्थेत होती. सकाळी शुद्धीवर आल्यानंतर ती कशीबशी घरी पोहोचून आपल्या कुटुंबीयांना सगळ्याचा खुलासा केला. तिच्या वेदनादायी अवस्थेमुळे घरच्यांमध्ये खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तातडीने परबत्ता पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी सहाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणाबाबत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कुमार यांनी सांगितले की, कुटुंबाच्या तक्रारीनंतर तातडीने कारवाई सुरू केली असून आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here