दि. १० जुलै राशिभविष्य : मिथून राशीतील चंद्राचा संचार राशींसाठी फायदेशीर

    मेष : आज तुमच्या मनाला भीती वाटू शकते तसेच काहीतरी अनुचित घटनेची आशंका वाटू शकते. तुम्ही एखाद्या उद्देशाने प्रवासाला जात असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. कोणालाही वचन देऊ नका. कदाचित तुम्ही ज्याचे भले करण्याचा प्रयत्न करीत आहात तो तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर सावध राहा. एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार करणे आवश्यक आहे.

    वृषभ : आज तुम्ही थोडा व्यस्त दिवस घालवू शकता. तुमच्यावर अतिरिक्त कामाचा तणाव असू शकतो. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला नवीन कामावर नियुक्त केले जाऊ शकते. घरगुती समस्यांविषयी बोलायचं झालं तर तिथेही तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कदाचित एखादा सल्ला कामी येईल आणि तुमचे काम पूर्ण होईल.

    मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस आहे. आज बऱ्याच काळापासून जे काम करायचे आहे असा विचार करत होतात तेच करण्याची संधी मिळेल. तुम्हाला जी व्यक्ती आवडते त्याची अचानक भेट होऊ शकते. त्याने तुमचा दिवस खास ठरेल. रोजगाराच्या क्षेत्रात असलेल्यांना आज लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

    कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा विचित्र असू शकतो. दिवसभर कोणता ना कोणता गोंधळ कायम असेल. मन जिद्दी असेल आणि कामात रस राहणार नाही. तुम्ही इतरांसाठी चांगला विचार करणे तुमच्यासाठीही चांगले असेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्या मदतीसाठी येईल. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस थोडा त्रासदायक असू शकतो.

    सिंह : आज तुम्ही थोडे सावध असणे आवश्यक आहे. आसपासच्या वातावरणावर बारीक नजर ठेवली पाहिजे. सभोवताली काय चालले आहे त्याची माहिती असणे गरजेचे आहे. विरोधक किंवा व्यवसायात एखादा प्रतिस्पर्धी असल्यास अशा व्यक्तीवर लक्ष ठेवा. आज लांबच्या प्रवासाचा योग आहे. आर्थिक वृद्धीच्या संधी मिळतील.

    कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. तुम्ही तुमच्या रागावर जरा नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. आज तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात. याचा तुम्हाला फायदा होईल. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल काळजी असेल. कौटुंबिक समस्या वाढू शकतात.

    तूळ : आज तुम्ही गोंधळात सापडू शकता. प्रियकर तुमच्यासमोर अशी मागणी ठेवेल की त्यामुळे तुम्ही गोंधळून जाल. अशा परिस्थितीत तुम्ही मनाचे ऐकले पाहिजे. असे काहीही करू नका की ज्यामुळे नाती खराब होतील. मंगल कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन मित्रांची भेट घेणे फायद्याचे ठरू शकते. नोकरीच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमचे कौतुक होईल.

    वृश्चिक : जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजूबाजूच्या लोकांची मदत घ्या. यापैकी एखादा कदाचित तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या बाजुने जे काही करावे लागेल ते वेळेत करा, मग त्याचा फायदा तुम्हाला होईल. प्रेमाच्या बाबतीत योग्य वेळ आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. पैशाच्या बाबतीतही दिवस चांगला आहे.

    धनू : आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आज तुम्ही तुमचे काम इतरांकडून करून घेण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही इच्छित काम साध्य करण्यासाठी मार्गस्थ होण्या आधीच कोणीतरी दुसरं ते काम करून निघून जाईल. तुम्हाला जे करायचे आहे, ते वेळ न घालवता करा. उत्पन्न चांगले राहील आणि स्वयंरोजगार करणारे लोक फायदेशीर सौदा अंतिम करू शकतात. आज पती-पत्नीच्या संबंधात थोडासा कडवटपणा येऊ शकतो. गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले होईल.

    मकर : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमचे जुने रखडलेले काम होत असल्याचे दिसत आहे. तुमचा मुद्दा तुम्ही स्पष्टपणे मांडा. आज तुम्ही लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवू शकता. तुम्ही देवळात मागणे मागितले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी बाहेर जा. आज प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. दोघांना वेळ देणे गरजेचे आहे.

    कुंभ : आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्या दैनंदिन जीवनात बदल घडणार आहेत. जर तुम्हाला नवीन स्थान प्राप्त होत असेल तर ते स्वीकारण्यात वेळ दवडू नका. नशिबाने संधी निर्माण होतील. जुन्या समस्या संपण्याची शक्यता आहे. आज आरोग्य थोडेसे नरम गरम असेल. दिवसभर काम केल्यासारखे वाटणार नाही. प्रेमाच्या बाबतीत आज तणाव असू शकतो. बोलण्यात माधुर्य असू द्या.

    मीन : आज तुम्हाला बाहेर जावे लागेल. एखाद्या कार्यक्रमासाठी सज्ज व्हावे लागेल. गर्विष्ठ व्यक्तीशी स्पर्धा करु नका. आज तुमचेही लक्ष आकर्षित होईल. वैवाहिक जीवनात आनंदी आनंद मिळेल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here