मुंबई (संपादक सुनिल पाटील) : मंगळवार दि. १३/०७/२०२१ कोरोना ताळेबंदीमध्ये शिथीलता आल्यावर उपनगरीय गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने परिणामी गुन्हयाचे प्रमाण देखील वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुन्हयांना प्रतिबंध होऊन प्रवाशांच्या सुरक्षेकरीता पोलीस आयुक्त कैसर खालीद व पोलीस उप आयुक्त पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग मुंबई प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पोलीस ठाणे अभिलेखावरील दाखल गुन्ह्यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.ए.इनामदार यांनी अभ्यास करुन, पॅरोलवर सुटणारे आरोपी यांचे अनुषंगाने पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी – अंमलदार यांना दादर रेल्वे स्टेशन येथे होणारे गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्याने नमुद ठिकाणी जास्तीत जास्त सापळे लावणेबाबत आदेशीत केले होते.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २१५/२०२१ कलम ३९२ भादंवि. प्रमाणे दाखल गुन्ह्यातील विशाल कुमार महेंद्र यादव. वय – ३१ वर्षे, व्यवसाय- बिगारी, राह. मालाड रेल्वे स्टेशन ब्रीजखालील साईट ऑफिस, मालाड, मुंबई हे दि. १२/०७/२०२१ रोजी दादर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ०१ वरील २३.१० वा. आलेले डाउन बोरीवली स्लो लोकलचे मोटरमन बाजुचे जनरल डब्यात प्रवास करणेकामी बसले असता नमुद लोकल सुरु होताच गुन्ह्यातील अटक आरोपी नामे – निसार अब्दुल अजीज खान. वय – २४ वर्षे, राह. सायान, धारावी, मुंबई याने फिर्यादी यांचे पाठीमागुन येवुन हातातील १३,०००/- रु. किं. चा एक विवो कंपनीचा लाल-काळे रंगाचा मोबाईल फोन जबरीने खेचुन चालु लोकलमधुन फलाटावर उडी मारुन पळत असताना फिर्यादी यांनी दरवाजात उभा राहुन मोठ-मोठ्याने चोर-चोर असा आरडा-ओरडा केला असता फलाटावर साध्या वेषात गस्त करणारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाठलाग करुन रंगेहाथ पकडले आहे. त्याचे अंगझडतीतुन वरिल मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेला आहे. फिर्यादी यांनी नमुद आरोपी यांचेविरुध्द दिले तक्रारीवरुन वरिल प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. एम. के. डोके. पो. हवा. ७१ एस. एफ. सोनावणे, पो. हवा. ३१८५ एस. व्ही. बने, पो. ना. २०६ एस. टी. महाडीक, पो. ना. १५७७ व्ही. व्ही. जाधव, पो. ना. ११६ एम. डी. पाटील, पो. ना. ६५७ ओ. व्ही. वळवी. पो. ना. ६३६ डी. एन. पाटील, पो. ना. २०६६ टी. एन. साळुखे. पो. शि. २२७३ वाय. एन. बच्चे, पो. शि. ५५२ एन. एच. गुरव.,यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.






