ख्रिस्तियानो रोनाल्डो गोल्डन बूटचा मानकरी

लंडन : युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या समारोपानंतर अन्य पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेतील अत्यंत मानाचा समजला जाणारा गोल्डन बूट पुरस्काराचा मानकरी पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला आहे. भले त्याच्या संघाला स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला असला तरीही रोनाल्डोच्या कामगिरीचे महत्त्व आबाधित राहिले.

स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर इटली आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. चुरशीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने ३-२ असा विजय मिळवला व विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर यंदाच्या स्पर्धेतील पुरस्कारांचे वाटप करण्यात आले यावेळी विजेतेपदाचा करंडक इटलीला दिल्यानंतर उपविजेत्याचा पुरस्कार इंग्लंडला देण्यात आला. मात्र, अनेकांचे लक्ष लागून राहिलेला गोल्डन बूट पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तीयानो रोनाल्डो याला देण्यात आला.

स्पर्धेत तब्बल ५ गोल करणाऱ्या रोनाल्डोचा संघ जरी बाद फेरीच्या सामन्यात बाहेर गेला असला तरी त्याने केलेल्या उत्कृष्ठ खेळामुळे त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघ आणि खेळाडूंना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी युरोपचे चॅम्पियन ठरलेल्या इटली संघाला तब्बल १० मिलियन युरो (८८ कोटी) देण्यात आले. तर उपविजेत्या इंग्लंड संघाला ७ मिलियन यूरो (६२ कोटी) देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here