प्रवीण तरडेंच्या ‘बलोच’मधील लूकला मिळतेय पसंती

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : समस्त महाराष्ट्रातील मराठी मनातील इतिहासातील भळभळती जखम म्हणजे पानिपतच्या लढाईत झालेला मराठ्यांचा पराभव. त्या पराभवनानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘बलोच’ या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.



मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तूत या चित्रपटाची कथा प्रकाश जनार्दन पवार यांच्या लेखणीतून साकार झाली आहे.

 


जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माता महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here